आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US Election : थिल्लर प्रचारामुळे अर्धे मतदार निराश, धोरणे, कल्पनांपेक्षा नाटकीपणाच वरचढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नोंव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. पण अमेरिकेच्या आधुनिक निवडणूक इतिहासातील सर्वात निकृष्ट दर्जज्ञचा प्रचार म्हणून ही मोहिम गणली जाते. तरीही या माेहिमेने सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कल्पकता आणि धोरणांऐवजी निवडणूक प्रचारातील नाटकीपणा लोकांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरले आहेत. जुलैमध्ये प्यूच्या पहाणीत असे आढळले की, तीन चतुथ्र्ांश मतदारंाना निवडणूक प्रचार ही आकर्षक बाब वाटली. पण ६५ टक्के मतदार असे म्हणतात की, हा प्रचार धोरणकेंद्रित नाही. टाईम मासिकाने बराक ओबामा,डेमोक्रेटिक उमेदवार हिलेरी क्लिंटन, मेलिंडा गेट्स सहित अन्य मान्यवरांकडून अमेरिकेसमोर असलेल्याआव्हानाबाबत लेख लिहून घेतले. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती करूनही त्यांनी लेख दिला नाही.

हिलरींनी चतुराईने निर्माण केले स्वत:चे स्थान
टाइम आणि सर्वेमंकी एजन्सीच्या पाहणीत एकाच्या तुलनेत दोन मतदार असा विचार करतात की, हिलरी क्लिंटन यांनी आपली बाजू आधिक प्रभावीपणे मांडली. त्या म्हणतात की, जेव्हा तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढविता तेव्हा तुम्ही निवडणूक जिंकल्यानंतर काय करणार हे सांगावे लागते. हिलरी यांच्या वेबसाइटवर १ लाख १२७३५ शब्दांमध्ये धोरणे विशद करण्यात आलेली आहेत. त्यांनी शिक्षण कर्ज,आऊटसोर्सिंगवर कर,पाच अब्ज सोलर पॅनल लावणे आणि रस्ते सुरक्षित करणे यावर जोर दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, हिलरींचे मदतनीस दिवसभर बसून धोरणे लिहितात. हा कागदांचा अपव्यय आहे, आधिक काही नाही. अध्यक्ष झाल्यास सिस्टिम बदलू असे ते म्हणतात.
काय म्हणतात अमेरिकन मतदार?
टाइम/ सर्वे मंकी यांच्या पाहणीत दहापैकी एक मतदार म्हणतात की, निवडणूक प्रचाराने आम्ही संतुष्ट आहोत. पण अर्ध्या लोकांनी भीती किंवा निराशेची भावना व्यक्त केली आहे. पाहणीचे काही निष्कर्ष असे..
कसा आहे मतदारंाचा मूड
 48% निराश,46% भयभीत, 23% दु:खी, 15% रोमांचित, 9% संतुष्ट
मतदारांच्या तीन प्रमुख चिंता
 61% अर्थव्यवस्था आणि नोकऱ्या,58% दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा,38% आरोग्य सेवा,ं, 28% इमिग्रेशन,22% बजेट तूट,21% बंदूक नियंत्रण ,19% सामाजिक सुरक्षा, 15% जलवायू परिवर्तन, 12% सरकारी नियंत्रण
ओबामांची धाेरणे Â 62% डेमोक्रेट म्हणतात की, त्यांच्या धोरणाने जीवन चांगले बनले. Â ७0% रिपब्लिकन म्हणतात की, त्यांचे जीव कठीण झाले.कोणी धोरणे चांगली सांगितली
 46% क्लिंटन, 23% ट्रम्प, 30% कोणीही नाही
आर्थिक असमानतेमुळे वाढतो अविश्वास
पुढे वाचा, ओबामा, क्लिंटन यांची काय आहेत मते...
बातम्या आणखी आहेत...