आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS शी लढताना मारली गेली ही तरुणी, कुर्दस्तानची होती \'अँजेलिना जोली\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो - कुर्दीश वुमन प्रोटेक्शन युनिटच्या सैनिक आसिया रमजान अंतर सीरियात इस्लामिक स्टेटशी(आयएसआयएस) लढताना मारली गेली. ती हॉलिवूड सुपरस्टार अँजेलिना जोलीसारख्‍या दिसत असल्याने चर्चेत होती. स्थानिक प्रसारमाध्‍यमांमधील बातम्यांनुसार, तुर्कस्तानच्या सीमेजवळील जराब्लसमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या लष्‍करी मोहिमेत आसिया मारली गेली. ती 2014 मध्‍ये कुर्दीश प्रोटेक्शन युनिटमध्‍ये(यूपीजी) सामील झाली होती. तिचा जन्म 1996 मध्‍ये सीरियन कुर्दीस्तानच्या कमिश्‍लो शहरात झाला होता. आयएसआयएसच्या विरोधातील युध्‍दात होत्या सामील...
- आसिया उत्तर सीरियात आयएसआयएसविरोधात अनेक मोठ्या युध्‍दात सामील झाली होती.
- सीरियन डेमोक्रेटिक दले व तुर्कीचे समर्थक असणा-या सीरियन विरोधकांमध्‍ये सुरु असलेल्या युध्‍दात तिचा मृत्यू झाला.
- कुर्दीश प्रोटेक्शन युनिटमध्‍ये 5 हजार सैनिक आहेत. यात 20 टक्के महिला आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा आसियाचे छायाचित्रे...