आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिना-सू की यांची महिला कामगारांवर चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांगून - हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोली सध्या म्यानमारच्या दौऱ्यावर असून शनिवारी तिने देशातील विरोधी पक्षनेत्या आँग सान सू की यांची भेट घेतली. या चर्चेत जोलीने महिला गारमेंट कारखान्यातील कामगारांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ऑस्कर विजेती जोली संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितासंबंधी संस्थेची विशेष दूत आहे. यांगून येथील सू की यांच्या निवासस्थानी दोघींमध्ये चर्चा झाली. त्यांनी सू की आणि जोली हलियांग था यार या छोट्या गावात असलेल्या कारखान्याला भेट दिली. हॉलीवूड स्टार आणि म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्यास जवळून पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. दोघींनी महिला कामगारांना त्यांच्या इच्छा, कामाच्या ठिकाणचे वातावरण, मोबदल्याचे स्वरूप यावर सविस्तर चर्चा केली. महिलांही खुलून बोलत होत्या.कामगारांचे हक्क आणि सुरक्षेवरून हा कारखाना संपूर्ण आशियात वादात सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर सू की-जोली यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. म्यानमार टेक्स्टाइल कामगारांनी यापूर्वी वेतनविषयक हक्कासाठी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन केले होते. २०११ मध्ये देशात जुंतांचे हुकूमशाही सरकार पायउतार झाले होते.

सू की यांचे निमंत्रण
लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांनी दिलेल्या निमंत्रणावरून अँजेलिना जोली म्यानमारच्या दौऱ्यावर आहे. देशात लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ब्रिटिश राजदूत कार्यालयाच्या सहकार्याने सू की यांनी कार्यक्रम आखला आहे. त्यात जोलीचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...