आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहताना मध्ये आलेल्या चिमुकलीला थेट उचलून फेकले, व्हायरल झाला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये गेल्या काही दिवसांत एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती बीजिंगमधील एका स्विमिंग पूलमध्ये 4 वर्षांच्या एका मुलीला उचलून दुसरीकडे फेकताना दिसत आहे. पोहताना ही मुलगी रस्त्यात येत होती म्हणून त्याने रागाने या मुलीला उचलून फेकले. मुलीच्या आईने जेव्हा त्याला अशा प्रकारच्या वर्तनाबद्दल माफी मागण्यास सांगितले त्यावेळी त्याने स्पष्ट नकार दिला. सुदैवाने या मुलीला कुठेही इजा झाली नाही. पुलाच्या सेक्युरिटी कॅमे-यात घटना कैद झाली, त्यानंतर संपूर्ण चीनमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला.

ही घटना 9 जुलैची आहे. 4 वर्षांची युआनयुआन झांग ही तिची बहीण आणि कुटुंबाबरोबर बीजिंगच्या पब्लिक स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होती. ती ज्या लेनमध्ये स्विमिंग करत होती, त्याच लेनमध्ये एक परदेशी व्यक्तीही होता. त्याचे नाव सू रूमिंग (एका वृत्तपत्रातील माहितीनुसार) असल्याचे सांगितले जात आहे. त्याने मुलीला अत्यंत निर्दयपणे उचलले आणि थेट दुसऱ्या लेनमध्ये फेकून दिले. त्यामुळे मुलगी चांगलीच घाबरली आणि रडायला लागली. त्यानंतर तो व्यक्ती लगेचच त्याठिकाणाहून निघून गेला.

मुलीच्या आईने नाराजी व्यक्त करत त्या व्यक्तिला माफी मागण्यास सांगितले. यामुळे मुलीला इजा झाली असती असे तिचे म्हणणे होते. पण रूमिंगने माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. तेव्हा रूमिंगने माफी मागितली.

पुढील स्लाइड्सवर संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...