आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाणेरड्या मांसाचा होत आहे पुरवठा, अशा अवस्थेत सापडले कत्तलखाने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वानसी - लोकांना खाण्यासाठी पुरवल्या जाणारे मांस किती घाणेरडे आहे याचे चित्र ब्रिटनच्या स्वानसी शहरात समोर आले आहे. या शहरात जनावरांच्या कत्तलखान्याचे फोटो पसरताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. कोर्टाने या प्रकरणी शिक्षा देखील सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक मेंढ्यांचे कापलेले शिर आणि धड जप्त केले आहेत. ते शिर आणि धड अक्षरशः चिखलात मिसळलेले होते. त्यांचे मांस एका घाणेरड्या कार्पेटवर ठेवण्यात आले होते. त्याचे नमुने टेस्ट केले असता ते आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

 

- पोलिसांनी 61 वर्षीय शेतकरी कॉर्मेलो गेल याला मांसाने भरलेल्या व्हॅनसह अटक केली. त्याला रस्त्यातच अडवून ही कारवाई करण्यात आली. 
- व्हॅनमध्ये लादलेले मांस तो बाजारात विकण्यासाठी निघाला होता. कोर्टात सांगितल्याप्रमाणे, त्याने कापलेल्या मेंढ्यांचे मांस खाण्यायोग्य मुळीच नव्हते. अतिशय अस्वच्छ असलेल्या त्या मांसाने संसर्ग होण्याची शक्यता होती. 
- अटकेत असलेल्या शेतकऱ्याने आपण शेताच्याच बाजूला घाणेरड्या चाकूने जमीनीवरच मेंढ्या कापत होतो. त्यांचे मटण सुद्धा घाणेरड्या प्लास्टिकच्या बकेट आणि कार्पेटवर ठेवायचो असेही त्याने मान्य केले. कोर्टाने त्याला असंख्य लोकांचे जीव धोक्यात टाकल्याप्रकरणी दोषी मानले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...