आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Strong Earthquake Hits In Nepal And Bihar News In Marathi

पुन्हा धरणीकंप; नेपाळमध्ये 59 ठार, 16 जणांना हार्टअटॅक, नागपुरातही धक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/पाटणा/कोलकाता/नवी दिल्ली- अवघ्या १७ दिवसांनंतर भूकंप आणि त्याची दहशत पुन्हा परतली. मंगळवारी दुपारी बारा-साडेबारा वाजता धरणी पुन्हा थरारली. आधीच धास्तावलेले लोक प्रचंड घाबरले आणि जिवाच्या भीतीने घराबाहेर पळत सुटले. बिहारमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १६ जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नेपाळमध्ये ६७ जण ठार झाले.
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.३ होती. मागील महिन्यात २५ तारखेला ७.९ तीव्रतेचा भूकंप आला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू याही वेळी नेपाळमध्ये काठमांडूपासून ७६ किलोमीटर अंतरावरील कोडारीत होता. सर्वात जास्त नुकसान दोलखा आणि सिंधुपालचौक जिल्ह्यात झाले. मागच्या भूकंपात भेगा पडलेली घरे या भूकंपाने कोसळली. हजारो लोक जखमी झाले. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे. जमिनीखाली १५ किलोमीटर खाेलीवर भूकंप आला होता. त्याने संपूर्ण नेपाळ, अर्धा भारत, चीन व अफगाणिस्तानचा काही भाग हादरला. काही दिवसांत आणखीही भूकंप होण्याची शक्यता आहे. २५ एप्रिलपासून नेपाळमध्ये भूकंपाचे १६० हून अधिक धक्के बसले.

अाधीच्या भूकंपात ८ हजारांवर मृत्यू
भूकंपानंतर हेलिकॉप्टर्स वैद्यकीय पथके घेऊन नुकसानग्रस्त जिल्ह्यांत बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत. दुसरीकडे, २५ एप्रिलला आलेल्या भूकंपातील मृतांचा आकडा ८ हजारांच्याही वर पोहोचला आहे. भारतीय वायुदलाची ८ हेलिकॉप्टर्स मदतकार्यासाठी नेपाळमध्येच आहेत.

मृत्यू स्पर्श करून जाताना पाहिला
मला वाटले मी आता मरणार. भूकंप थांबला अन् वाटले जणू मृत्यूच स्पर्श करून गेला आहे. आता सर्व पूर्वपदावर येत आहे, मात्र, हृदयाची धडधड थांबलेली नाही.
- सुलव सिंह, नेपाळचा नागरिक

फक्त चार सेकंदांत सगळीकडे अाक्राेश
ज्या क्षणी जमीन हादरली, सर्व स्तब्ध झाले. मात्र, चारच सेेकंदांत प्रत्येक ठिकाणी फक्त चित्कारच एेकू येत होते. सर्व पळापळ करत होते.
- मार्क सॅरेडो, नेपाळमध्ये आलेले पर्यटक

>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्कालीन बैठक बोलावली, बचावपथके अलर्टवर
> नेपाळमध्ये पीएमओलाही तडे गेले, राष्ट्रीय संसदेतून नेत्यांची पळापळ
> अमेरिकी वैज्ञानिकांनी सांगितले : अाणखी आफ्टरशॉक बसण्याची शक्यता

नागपुरातही साैम्य धक्के
नागपूर- नेपाळचा भूकंप नागपुरातही जाणवला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मंगळवारी इतवारी, महाल, धरमपेठ, मानेवाडा, जाफरनगर, रामदासपेठ, धंतोलीत दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी काही सेकंदांचे साैम्य धक्के जाणवल्याच्या तक्रारी येत होत्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नेपाळमधील स्थिती...