आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : नेपाळमध्‍ये पुन्हा भूकंप, 42 जणांचा मृत्यू, 1हजार जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमधील नया बाजारमध्‍ये चार मजली इमारत कोसळली.
काठमांडू - नेपाळ-भारतासह दक्षिण आशियात मंगळवारी(ता.12) भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 25 एप्रिल रोजी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून बाहेर पडण्‍याचा प्रयत्न करत असताना नेपाळला मंगळवारी पुन्हा भूकंपाने हलवले. यात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू, तर 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक वेळेनुसार पहिला धक्का दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी बसला. हानी टाळता यावी यासाठी काठमांडू विमानतळ बंद करण्‍यात आले आहे. काठमांडू येथे येणारी जेट एअरवेजला लखनौकडे वळवण्‍यात आली आहे.आतापर्यंत नेपाळमध्‍ये सहा भूकंपाचे धक्के बसले आहे.
स्थानिक वेळेनुसार पहिला धक्का दुपारी 12 वाजून 35 मिनिटाला बसला. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाची तीव्रता 7.3 र‍िश्‍टर स्केल अशी नोंदण्‍यात आली होती. त्याचे केंद्र नेपाळमधील कोडारी हे आहे. मंगळवारी आलेल्या भूकंपाचे धक्के पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्‍येही जाणवले.
केंद्रवेळतीव्रता
कोडारी12.35 PM7.3
कोडारी12.47 PM5.6
रामेछाप01.06 PM6.3
कोडारी01.36 PM5.0
कोडारी01.43 PM5.1
कोडारी (15 किमी. खाली)01.51 PM5.2
पुढील स्लाइड्सवर पाहा, नेपाळची संसद असे जाणवले धक्के... यासह इतरही VIDEOS