आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशमध्‍ये फुटीरवादी संघटना अन्सरुल्ला बांगला टीमवर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मुक्तो मना' साठी लेखर करणारा ब्लॉगर अविजीत रॉयवर हल्ल्यानंतरचे छायाचित्र. - Divya Marathi
'मुक्तो मना' साठी लेखर करणारा ब्लॉगर अविजीत रॉयवर हल्ल्यानंतरचे छायाचित्र.
ढाका - बांगलादेशने एक इस्लामिक फुटीरवादी संघटनेवर बंदी घातली आहे. देशातील ब्लॉगर्सच्या हत्येमागे अशा संघटनांचे हात असल्याचे मानले जात आहे. बांगलादेश सरकारने सोमवारी फुटीरवादी आणि देश-विदेशातील हालचालींमध्‍ये सामील संघटना अन्सरुल्ला बांग्ला टीमवर(एबीटी) प्रतिबंध घातले आहे. ही सहावी संघटना आहे.

पोलिस अहवालानुसार या आठवड्याच्या सुरुवातीला अन्सरुल्ला संघटनेवर बंदी घालण्‍याचा निर्णय घेतला होता. आम्ही आजपासून बंदी लागू करित आहोत, असे बांगलादेश गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री असादुझमन खान कमान यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्‍ये बांगलादेशमध्‍ये तीन प्रसिध्‍द ब्लॉगर्सची निघृण हत्या करण्‍यात आली आहे. या हत्यांमागे अन्सरुल्ला बांग्ला टीमचा हात असल्याचे अंदाज व्यक्त केला जातो. या महिन्याच्या सुरुवातीला सिल्हेट शहरात चाकूने 33 वर्षाचा ब्लॉगर अनंत ब‍िजॉय दास याची हत्या करण्‍यात आली होती. फेब्रूवारीत बांगलादेश-अमेरिकन लेखक अविजीत रॉयची(वय-45) हत्या करण्‍यात आली.
बांग्ला टीम व्यतिरिक्त हिज्ब उत-तहरीर, जमाउतुल मुजाहिद्दीन बांगलादेश, हरकतूल जिहाद बांगलादेश, जगराता मुस्लिम जनता ऑफ बांगलादेश आणि शहादत-ए अल-हिकमावर बंदी घातली आहे.
बातम्या आणखी आहेत...