आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाकविरूद्ध युध्दाची घोषणा करा; अफगाणिस्तानच्या नागरिकांचे राष्ट्रपतींना आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल- अफगाणिस्तानमध्ये ठिक-ठिकानी पाकिस्तानविरोधात प्रदर्शने करण्यात येत आहे. पाकिस्तानने अफगाणच्या नंगरहार आणि कुनार येथे केलेल्या गोळीबाराचा अफगाण नागरिकांकडून निषेद करण्यात येत आहे. प्रदर्शनकर्त्यांनी राष्ट्रपती अशरफ गनी यांना पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याचे अवाहन केले आहे.

- 21 फेब्रूवारीला हेलमंदची राजधानी लश्करगाह येथे पाकिस्तान विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान दहशतवादचा पुरस्कर्ता असल्याचे यावेळी म्हटले आहे.
- प्रदर्शनकर्त्यांनी राष्ट्रपती गनी यांना पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याचे अवाहन केले आहे.

काय म्हणाले अफगान सिव्हील सोसायटीचे सदस्य..?
- सदस्य म्हणतात- पाकिस्तान आर्मी आणि दहशतवाद्यांच्या तावडीत सापडून अफगाणिस्तानला संपवू देणार नाही.
- बलूचिस्तान आणि इतर परिसरात राहणाऱ्या अफगाण नागरिकांना दहशतवादी समजून पकिस्तान टॉर्चर करत आहे. नंगरहार आणि कुनार या सरख्या अफगानच्या शहरांत मिसाइड अटॅक करण्यात येत आहे.
- डूरंड लाइन (पाक-अफगान बॉर्डर) वरही पाकिस्तानी आर्मीच्या हालचाली सुरू आहेत, असेही सांगितले जात आहे.
- उच्चशिक्षित आणि आयएसआय पाकिस्तानी तरूणांना धर्माच्या नावावर भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा पाक तालिबानने केला आहे.
- फक्त तालिबानच नाही, तर लश्कर-ए-झांगवी, जैश-ए-मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्क यासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या धर्तीवरून दहशतवाद पसरवत आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा प्रदर्शनकर्त्यांचा व्हिडिओ आणि फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...