आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकाकणाऱ्या मंदिरांपासून जंगलापर्यंत सर्व काही काळवंडले, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियातील बाली येथे आगुंग डोंगरात ज्वालामुखीचे स्फोट सुरू आहेत. या स्फोटांचा आवाज आणि त्यातून निघणारे राखेचे वादळ 12 किमी पर्यंत एकायला आणि पाहायला मिळत आहेत. प्रशासनाने ज्वालामुखीचा मोठा उद्रेक होणार असल्याचा इशारा यापूर्वीच जारी केला. गेल्या काही दिवसांपासून आकाशात 4 किमी उंच राखेचे वादळ पसरले आहे. 6 किमी पर्यंतचा भाग लावारसने व्यापला आहे. या परिसरातील घर आणि मंदिरांपासून जंगलांपर्यंत सर्व काही काळवंडले आहे. 

 

> 1963 मध्ये इंडोनेशियाच्या आगुंग ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यावेळी 1100 जणांचा मृत्यू झाला. 54 वर्षांनंतर जगातील सर्वात कुख्यात ज्वालामुखींपैकी एक आगुंग पुन्हा भडकले आहे. 
> ज्वालामुखी उद्रेकामुळे वारंवार भूकंप येत आहेत. 4 किमी पर्यंत उंच असे राखेचे वादळ पसरले आहे. त्यामुळे, प्रशासनाने 20 किमी परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. 
> इंडोनेशियाच्या बाली बेटावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा सर्वच फ्लाइट रद्द झाल्याने हजारो पर्यटक अडकले आहेत. इंडोनेशियात 120 ज्वालामुखी असून त्यामध्ये आगुंग सर्वात घातक आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विनाशकारी ज्वालामुखी उद्रेकाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...