आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पची ऑर्डर मागे घ्या, अन्यथा लीगल एक्शन घेणार, अॅपलचे CEO टीम कूक यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कूक म्हणाले, आम्ही जगभरातून येणाऱ्यांचे खुल्या दिलाने स्वागत करतो, हेच तर आमचे वैशिष्ट आहे. (फाइल) - Divya Marathi
कूक म्हणाले, आम्ही जगभरातून येणाऱ्यांचे खुल्या दिलाने स्वागत करतो, हेच तर आमचे वैशिष्ट आहे. (फाइल)
वॉशिंग्टन - अॅपल या जगविख्यात कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पॉलिसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. ट्रम्प यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचे कूक म्हणाले. याबाबत लीगल अॅक्शनचा विचार करत असल्याचेही कूक म्हणाले. कूक यांच्यापूर्वी गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्रम्पच्या ऑर्डरवर टीका केली आहे. 

ऑर्डर मागे घेतली नाही तर कोर्टात जाणार.. 
- वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार कूक म्हणाले की, ट्रम्प यांच्या इमिग्रेशन बॅनमुळे माझ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होतोय. 
- व्हाइट हाऊस ही ऑर्डर मागे घेईल अशी मला आशा आहे. पण तसे झाले नाही, तर आमची कंपनी याच्या विरोधात कोर्टात जाईल. 
- याबाबत व्हाइट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचेही कूक म्हणाले. 
- कोणत्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली हे मात्र कूक यांनी स्पष्ट केलेले नाही. 
- ट्रम्प यांनी डिसेंबरमध्ये कूकसह काही कंपन्यांच्या प्रमुखांना ते स्वतः सर्वांना फोन करतील असे सांगितले होते. 

जगभरातून येणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो 
- कूक यांच्या मते, इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत आपला देश अधिक मजबूत असण्याचे कारण म्हणजे आपल्याला असलेला इमिग्रेंट्सचा सपोर्ट हे आहे. 
- जगभरातून येणाऱ्या लोकांचे आपण मनापासून स्वागत करतो ही आपली कॅपेसिटी आणि एबिलिटी आहे. हेच तर आपल्याला इतरांपेक्षा खास आणि वेगळे बनवते. 
- हे थांबवणारा नियम आपण मागे घ्यायला हवा आणि याबाबत गंभीर विचार करायला हवा. 
- कूक म्हणाले त्यांचे कर्मचारी त्यांनी नव्या इमिग्रेशन ऑर्डरबाबत सारखे ईमेल करत आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे सद्यस्थिती, ट्रम्प यांची ऑर्डर आणि रेफ्युजींवर 120 दिवस बंदी..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...