आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या अॅपल संगणकाच्या प्रतिरूपाचा लिलाव ५.४ काेटीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूूयाॅर्क- एखाद्या संगणकाच्या प्रतिरूपाचा लिलाव हाेऊ शकताे? अॅपलचा पहिला संगणक ‘अॅपल १’ चे प्रतिरूप ८.१५ लाख डाॅलर (५.४६ काेटी रूपये) मध्ये लिलावात विकला गेला. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जाॅब्ज अाणि स्टीव्ह वाेजनियाक यांनी १९७६ साली संगणक बनवण्यास सुरूवात केली हाेती. यावर्षी जुलैमध्ये पहिला संगणक ४४,६६७ रूपयांना विकला हाेता. या बाबीचा विचार करता पहिल्या संगणकाच्या तुलनेत त्याच्या प्रतिरूपाचा लिलाव १,२२२ पट अधिक किमतीने झाला.

संगणक इतिहासकारांच्या मते हा भलेही जगातील पहिला संगणक नसेल मात्र पहिल्या संगणकांपैकी एक निश्चितच अाहे. याचा लिलाव ‘चॅरिटीबझ’ने केला. या प्रतिरूपाचा लिलावाच्या वेळी बाेली १० लाख रूपये पर्यंत पाेहाेचेल अशी अपेक्षा हाेती मात्र एका व्यक्तीने १२ लाख डाॅलरची बाेली लावली. ताेपर्यंत लिलावाची वेळ संपली हाेती. या लिलावात ८० जण सामिल झाले हाेते. या ‘अॅपल १’ ची खरेदी ग्लेन अाणि शेनाॅन दांम्पत्याने केली.
स्टीव्ह जाॅब्ज अाणि वाेजनियाक यांच्यासाेबतच राेनाल्ड वेन ने एप्रिल १९७६ राेजी एका गॅरेजमध्ये अॅपलची स्थापना केली हाेती. या तिघांचाही पहिला माेठा प्राेजेक्ट ‘अॅपल १’ हाच हाेता. सिलिकाॅन व्हॅलीमधील हाेमब्रियू संगणक क्लबमध्ये ताे पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात अाला. या प्रकल्पासाठी पैसा उभारण्याकरिता जाॅब्ज अाणि वाेजनियाक यांना अनेक घरगुती वस्तू विकाव्या लागल्या हाेत्या. कंपनी स्थापन झाल्यानंतर वेनने दाेन अाठवड्यातच अापले १० टक्के समभाग अवघ्या ८०० डाॅलर (५३,६०० रूपये) ला विकले हाेते.
बातम्या आणखी आहेत...