आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल, गुगल अाणि फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मसाठी स्वत: मालिका बनवणार, पुढील वर्षी सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- अॅपल, गुगल आणि फेसबुकवरून तुम्ही लवकरच टीव्ही मालिका पाहू शकाल. एवढेच नव्हे तर तुम्ही स्वत: मालिकेची निर्मिती करून तसेच चर्चेतील मालिकांचे लाइव्ह स्ट्रीमिंगही दाखवू शकाल. याचा अर्थ ज्या वेळी एखादी मालिका टीव्हीवर येत असेल तेव्हा तुम्ही त्यांच्या प्लॅटफॉर्मवरही ती पाहू शकाल. या तीन बड्या कंपन्यांच्या प्रवेशाआधी टीव्ही उद्योगात स्पर्धा आणखी वाढेल.

सध्या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन व हुलू ५० टक्के भागीदारीसोबत बाजारात अग्रेसर आहेत. या वर्षी या प्लॅटफॉर्मवर ५०० पेक्षा जास्त मालिका दाखवण्याची अाशा आहे. हा आकडा सहा वर्षांआधीच्या तुलनेत दुप्पट आहे. संबंधित कंपन्यांनी या पूर्ण प्रकल्पाची माहिती अद्याप दिली नाही. मात्र, चीनच्या एका कर्मचाऱ्याने सोशल साइट्सवर छायाचित्र टाकून दावा केला की, हे छायाचित्र अॅपल टीव्हीच्या टेस्टिंग लॅबचे आहे.  अॅपलने या प्रकल्पासाठी हॉलीवूडचे जेमी एर्लिचट व जॅक व्हॅन अंबर्ग यांना घेतले आहे. दोघे सोनीच्या टीव्ही स्टुडिओच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी द क्राऊन व ब्रेकिंग बॅड यासारख्या प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली आहे.  
 
फेसबुकवर कमाईची संधीही: फेसबुकने या दिशेने पाऊल टाकत लाइव्ह स्ट्रीमिंग टीव्ही “वॉच’ लाँच केला आहे. याशिवाय कंपनी टीव्ही कार्यक्रमादरम्यान येणारे ब्रेक व युजर्सना उत्पन्नाची संधीही देईल. युजर्सना प्रायोजित सामग्री तयार करावी लागेल. त्यासाठी त्यांना पैसे दिले जातील. युजर्स टीव्ही पाहताना आपापसात चॅटही करू शकतील.
 
भारताच्या इरॉस ग्रुपकडून बॉलीवूड कंटेंट खरेदी करू शकेल अॅपल: अॅपल बॉलीवूड चित्रपट व संगीताची सामग्री खरेदी करण्यासाठी भारताच्या इरॉस ग्रुपशी चर्चा करत आहे. हा व्यवहार ६,५०० कोटी रुपयांचा होऊ शकतो. याअंतर्गत इरॉस ग्रुप आपली पूर्ण कंटेंट लायब्ररी अॅपलला विकेल.  

अॅपलची सुरुवातीची गुंतवणूक ६५०० कोटी रुपयांची
अॅपल, गुगल व फेसबुकने टीव्ही बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी तगडे बजेट ठेवले आहे. गुगल काही प्रकरणांत एका भागावर १९५ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यास तयार असल्याचे सांगितले जाते, यावरून याचा अंदाज येतो.
 
बातम्या आणखी आहेत...