आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Emotional Like : आईच्या आठवणीने मोदींचा कंठ आला दाटून, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था (सॅन फ्रान्सिस्को) - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी फेसबुकच्या मुख्यालयात गेले. त्यांनी सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान मार्क यांनी मोदी यांच्या आईचा उल्लेख केला. मोदींनी सागितले- मी गरीब कुटुंबातून आलो आहे. बालपणी चहा विकला. माझे वडील हयात नाही. आई आहे. तिचे वय ९० वर्षांपेक्षा जास्त आहे. आजही ती स्वत:ची कामे स्वत:च करते. आम्ही लहान असताना ती उपजीविकेसाठी भांडी घासायची. (हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला) एका आईने तिच्या मुलांना वाढवण्यासाठी किती कष्ट उपसले असतील, याची तुम्ही कल्पना करू शकता. मी सर्वच मातांना वंदन करतो. या वेळी कार्यालयात झुकेरबर्ग यांचे आई-वडील उपस्थित होते. उपस्थित लोकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

झुकेरबर्ग यांनी म्हटले
एककाळ असा होता की, फेसबुक खरेदी करण्यासाठी फोन यायचे. मीदेखील त्रस्त होतो. त्या वेळी मी स्टिव्ह जॉब्सकडे गेलो. त्यांनी सांगितले- भारतात जाल, तर मंदिरात अवश्य जा. मी भारतात गेलो आणि मला पुढचा मार्ग सापडला...!

भारताच्या भविष्याबाबत जग आशादायी का?
भारतजगातील फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी असल्याचे वर्ल्ड बँक, आयएमएफसह जगभरातील रेटिंग एजन्सीज सांगत आहे. आमची आठ ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी आहे. ती २० ट्रिलियन डॉलर्स करण्याचे माझे स्वप्न आहे. गमावलेला विश्वास आमच्या सरकारने १५ महिन्यांत मिळवला. आयसीयूतील रुग्णालाही त्याचा डॉक्टर येताच बरे होण्याचा विश्वास असतो, तो खडखडीतही होतो.
गूगलमध्येही...
फेसबुक कार्यालयातून मोदी गुगल कार्यालयात पोहोचले. सीईओ सुंदर पिचई यांनी त्यांना कार्यालय दाखवले आणि खासियत सांगितली. मोदींनी येथेही स्टाफसोबत संवाद साधायचा होता. रात्री उशिरा (भारतीय प्रमाण वेळेनुसार ५.३० वाजता) मोदी भारतीय वंशाच्या लोकांसोबत असतील. डिजिटल इंडियाची माहिती देतील. २८ तारखेला ओबामांना भेटतील.
भारतातील व्यवसाय १५ महिन्यांत सुलभ झाला?
१००दिवसांत १८ कोटी बँक खाती उघडली. लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग, स्किल्ड मॅनपॉवर, रॉ मटेरियल्स, बिझनेस मार्केट इन इंडिया... ही शक्यता मेक इन इंडियासाठी आहे. देश तरुण असावा. डेमोक्रसी, मीडिया आणि ज्युडिशियरी व्हायब्रंट असेल, तर समान विचारसरणीच्या देशांना संधी असते. यात डी-रेग्युलरायझेशन करत आहे. हॉटेल चालवायचे असल्यास लोकं चालवतील. हे सरकारचे काम नाही.
टॉप टेक सीईओंचेे मोदींना वचन; अॅपल उभारणार प्रकल्प, गूगल 500 रेल्वेे स्थानकांवर देणार मोफत वाय-फाय, मायक्रोसाफ्ट बनणार 5 लाख ई-खेडी

क्वॉलकॉम : १०००कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. हा पैसा स्टार्टअप कंपन्यांना देणार. भारतात चीप डिझाइन करणार.

मायक्रोसॉफ्ट : भारतात लवकरच क्लाऊड डाटा सेंटरची घोषणा करणार. लाख खेड्यांना आयटीशी जोडणार.

गूगल: भारतातील५०० रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सुविधा देणार, आठ भारतीय भाषांमध्ये इंटरनेट अँड्रॉईड फोन लाँच करणार.

अॅपल : भारतातमॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प सुरू करण्यास आणि अॅपल पे जनधन योजनेसोबत जोडण्यास संमती दिली
६५ लाख कोटींचे सीईओ मोदींसोबत
मोदींच्या सोबत सिस्कोचे (८.४७ लाख कोटी) जॉन चेंबर्स, २२.७७ लाख कोटींच्या मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ५.५३ लाख कोटींेची कॉलकाॅमचे पॉल जेकब्स आणि २८.९७ लाख कोटींची गुगल सीईओ पिचाई.
यादरम्यान येथून गुंतवणूक वाढली
87.91% मॉरिशस
16.07% सिंगापूर
20.87% जपान
131.95% अमेरिका
13.31% जर्मनी
110.69% फ्रांस
२०१३-१४ मध्ये
1,47,518 कोटी
२०१४-१५ मध्ये
1,89,107 कोटी
ही आहे डिजिटल क्रांती
भारतातील खेड्यांमध्ये आई नवजात बाळांना वाचवत आहे. मुलांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळत आहेत. सॅनफ्रॉन्सिकोमधील व्यक्ती भारतात आजारी आजीबरोबर रोज स्काईपीवर संवाद साधत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर...