आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple Will Have To Pay 234 Million To University For Infringing Patent

APPLE वर भारतीयांचे तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप, द्यावे लागणार 1478 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरिंदर सोही आणि टी.एन. विजयकुमार यांनी विकसित केलेल तंत्रज्ञान अॅपलने चोरल्याचे सिद्ध झाले आहे. हे दोघेही बिट्स पिलानीचे विद्यार्थी आहेत. - Divya Marathi
गुरिंदर सोही आणि टी.एन. विजयकुमार यांनी विकसित केलेल तंत्रज्ञान अॅपलने चोरल्याचे सिद्ध झाले आहे. हे दोघेही बिट्स पिलानीचे विद्यार्थी आहेत.
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या एका न्यायालयाने पेटेंट चोरी प्रकरणी अॅपलला 234 मिलिअन डॉलर (जवळपास 1478 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ व्हिसकॉन्सिन मेडिसनच्या मायक्रोचिप टेक्नॉलॉजी पेटेंट चोरी प्रकरणी अॅपल दोषी आढळले आहे. याच विद्यापीठाला ही रक्कम दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या टीममध्ये दोन भारतीयांचा - गुरिंदर सोही आणि टी.एन. विजयकुमार यांचा समावेश आहे. हे दोघेही बिट्स पिलानीचे विद्यार्थी आहेत.

काय आहे प्रकरण

>> अॅपल आयफोन 5S, 6 आणि 6S मध्ये मायक्रोचिप टेक्नॉलॉजी A7, A8, आणि A8X चा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान युनिव्हर्सिटी ऑफ व्हिसकॉन्सिन मेडिसनने विकसित केले होते.
>> या तंत्रज्ञानाचे पेटेंट विद्यापीठाने 1998 मध्ये घेतले होते. विद्यापीठाच्या अॅन्यूमनी रिसर्च फाउंडेशनने हे तंत्रज्ञान विकसित केले होते.