आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple's Quarterly Profits Rise 33 Percent Over Last Year

अॅपलची दररोज 7 लाख आयफोन विक्री, तिमाहीत नफा ३३ टक्क्यांनी वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क - जगातील दिग्गज कंपनी अॅपलने कमाईचा पुन्हा विक्रम केला आहे. मंगळवारी जारी अहवालानुसार, अॅपलने २०१५च्या पहिल्या तिमाहीत ८६ हजार कोटींंचा नफा कमवला आहे. भारतात एका तिमाहीत सर्वाधिक नफा कमवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा तो १४ टक्क्यांनी अधिक आहे. मागच्या तिमाहीच्या तुलनेत अॅपलची कमाई २७ टक्के आणि नफा ३३ टक्क्यांनी वाढला आहे. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले की, मध्यमवर्गीयांमध्ये आयफोनचे आकर्षण वाढले असून हा त्याचाच परिणाम आहे. अॅपलने जानेवारी-मार्च तिमाहीत ६.२ कोटी अर्थात दररोज लाख आयफोनची विक्री झाली.
नफा: मार्चतिमाहीत आयफोनची सरासरी किंमत ६५९ डॉलर (४१,८५० रुपये) होती. यावर ४०.८ टक्के नफा होता. दरम्यान, सॅमसंग या दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन कंपनीचा नफा १० टक्क्यांहून कमी होता.

क्रेझ: जागतिकस्मार्टफोन बाजारात २१ टक्के भागावर अॅपलचे वर्चस्व आहे. चीनमध्ये यात ७१ टक्क्यांची आणि भारतात मागच्या वर्षी ५५ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबरपर्यंत १० लाखांपेक्षा जास्त विक्री.
अॅपलची रोकड
12लाख 28 हजार कोटी. {अन्यचार दिग्गज कंपन्यांचे भांडवल 13लाख 5 हजार कोटी रुपये
अॅपलकडील रोकड 4 दिग्गज कंपन्यांच्या भांडवलाच्या बरोबर

नफ्याची दोन कारणे
पहिले-जास्त नफ्यावर विक्री, दुसरे-आयफोनचे आकर्षण
{अॅपलचे भांडवल 49 लाख कोटी (772 अब्ज डॉलर)
{मायक्रोसॉफ्टचे 394अब्ज गुगलचे 385 अब्ज डॉलरच्या बरोबर.
{बीएसईयादीतील 5,600 कंपन्यांचे भांडवल सुमारे 100 लाख कोटी रुपये आहे. {अर्थातअॅपलचे भांडवल आपल्या निम्म्या कंपन्यांच्या बरोबर आहे.

वर्षांत १२३% वाढले मूल्य
स्टीव्हजॉब्ज यांच्या मृत्यूनंतर ऑगस्ट २०११ मध्ये टीम कुक सीईओ बनले. तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य २२ लाख कोटी होते. आतापर्यंत यात १२३ टक्क्यांची वाढ झाली आहे.


कंपनी बाजार भांडवल
टीसीएस4,88,614 कोटी रु.
रिलायन्स 2,79,922 कोटी रु.
आयटीसी 2,70,532 कोटी रु.
ओएनजीसी 2,66,252 कोटी रु.