आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arab Female Bodybuilder Haifa Musawi Looks Abroad For Recognition

ही बॉडीबिल्डर करिअरसाठी स्वीकारणार दुसऱ्या देशाचे नागरिकत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहरीनची बॉडीबिल्डर हैफा मुसावी. - Divya Marathi
बहरीनची बॉडीबिल्डर हैफा मुसावी.
दुबई - अरब देशातील कट्टरतापादी समाजात 32 वर्षीय हैफा मुसावी हिने करिअर म्हणून बॉडीबिल्डिंगची निवड केली खरी. पण बहरीनमधील या तरुणीचे करिअरचे स्वप्न स्वप्नच बनून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. हैफा दुबईमध्ये वेट स्पेशालिस्ट म्हणून ती काम करते. याठिकाणी महिलांसह पुरुषांनाही ती प्रशिक्षण देते. पण त्याचबरोबर आता व्यावसायिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ती पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिला युरोपीय देशांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकेल.

व्यावसायिक स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा
हैफाला व्यावसायिक स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. तसेच तिला आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डींग संघटनेबरोबरही संलग्न व्हायचे आहे. पण तिला बहरीन किंवा इतर आखाती देशांचे प्रतिनिधित्व करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्याचे कारण म्हणजे या देशांमध्ये महिलांसाठी बॉडीबिल्डिंगची टीमच नाही. त्यामुळे हैऱा यावर्षी पोर्तुलाचे नागरिक्त्व स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला युरोपीय देशाचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. त्यासाठी पोर्तुगालची एक ट्रेनर अँड्रिया सौसा तिला मदत करत आहे.

वजन कमी करण्यासाठी...
हैफा तिच्या वजनामुळे आणि शरिराच्या शेपमुळे चिंतीत होती. वजन कमी करण्यासाठी तिने ट्रेनरच्या शोधासाठी सुमारे 10 वर्ष आधी वर्कआउट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बॉडीबिल्डींग करायला सुरुवात केली. पण तिला याबाबत काहीही अनुभव नव्हता. ती रोज जिममध्ये जायची. तिच्यासाठी त्यापेक्षा जास्त गरजेचे असे काहीही नव्हते. वजन कमी करायसाठी आईला आधी हा प्रकार आवडत नव्हता. पण आईने तिला एका स्पर्धेत पाहिले. ती स्पर्धा हैफाने जिंकली त्यामुळे आई तयार झाली. त्यानंतर कुटुंबाने सपोर्ट केल्याचे हैफा सांगते.

अनेक स्पर्धा जिंकल्या...
गेल्या दहा वर्षांत हैफाला इंटरनॅशनल फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग असोसिएशनची अनेक प्रमाणपत्रे मिळाली आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात दुबईत इंटरनॅशनल नॅच्युरल बॉडीबिल्डिंग असोसिएशन चॅम्पियनशिपमध्ये फिजिक कॅटेगरीत तिला 6 वे स्थान मिळाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हैफाचे काही PHOTOS