आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argentinian MP Victoria Donda Perez Praised For Breastfeeding In Parliament

अर्जेंटिना : संसदेच्या कामकाजादरम्यान बाळाला Breastfeeding, फोटो व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळाला दूध पाजताना अर्जेंटिनाच्या खासदार विक्टोरिया. - Divya Marathi
बाळाला दूध पाजताना अर्जेंटिनाच्या खासदार विक्टोरिया.
ब्यूनस आयर्स - अर्जेंटिनाच्या खासदार विक्टोरिया डोन्डा पेरेज यांच्या बाळाला दूध पाजत असतानाच्या एका फोटोने सध्या इंटरनेटवर खळबळ माजवल आहे. सोशल मिडियावर अनेकांनी या फोटोचे चांगलेच कौतुक केले तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे. हा फोटो संसदेचे कामकाज सुरू असताना काढण्यात आला आहे. त्यावेळी अर्जेंटिनाच्या नॅशनल काँग्रेसची बैठक सुरू होती.

अर्जेंटिनामधील 37 वर्षीय खासदार व्हिक्टोरिया त्यांच्या ग्लॅमरस लूकबाबत नेहमी चर्चेत असतात. त्यामुळेच त्यांना त्याठिकाणी 'डिपुसेक्स' (सेक्सी एमपी) असे नाव देण्यात आले आहे. फोटोमध्ये व्हिक्टोरिया यांच्या कुशीत त्यांची आठ महिन्यांची मुलगी असून तिला त्या दूध पाजत असल्याचे दिसते आहे. 1977 मध्ये जन्मलेल्या व्हिक्टोरिया अर्जेंटिना नॅशनल काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण खासदार आहेत. 2007 मध्ये त्या खासदार बनल्या होत्या.

राजधानी ब्यूनस आयर्स येथील काँग्रेसनल पॅलेसमध्ये घेण्यात आलेल्या या फोटोबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मिडियावर काही जण त्यांनी आदर्श म्हणून संबोधत आहेत, तर काही जण हा प्रकार बेजबदार पणाचा असल्याचे म्हटले आहे. मात्र बहुतांश नेट यूझर्सनी व्हिक्टोरीया यांचे कौतुकच केले आहे.

सोशल मिडियावरील काही निवडक प्रतिक्रिया
Naty Marquiegui Mc ‏@Natymarq
Mamá full time. En plena sesión, Victoria Donda. इंग्रजीत (MOM full time. In full session, Victoria Donda.)
Anoop K.N. ‏@anoopkn
Victoria Donda Pérez breastfed her eight-month-old daughter Trilce. There wouldn't have been anything unusual
Renkian ‏@_Skendong
Glamorous Argentinian MP Victoria Donda Perez, breastfeeds her 8-month-old daughter at work.

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिक्टोरिया यांचे PHOTOS