आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी गेली, परंतु भुकेलेल्यास सँडविच खाऊ घालून गेली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅरिझोना- दारावर येणारा कोणताही याचक भुकेल्या पोटी परत जाता कामा नये, असे आपले संस्कार सांगतात. लहानपणी आपण हेच ऐकलेले असते. अॅरिझोनाच्या सवानानेदेखील असेच केले. मग तिला कोणत्या चुकीची एवढी शिक्षा भोगावी लागली?

घटना अमेरिकेतील अॅरिझोनाच्या सबवेवरील आउटलेटची आहे. एक दिवस एक बेघर व्यक्ती आला. त्याने सँडविच मागितले. त्याच्याकडे पैसे नव्हते. सवानाने त्यास सँडविच दिले. बस, तिचीही हीच चूक झाली होती. बॉसने तिला चांगलेच फटकारले आणि एखादा व्यक्ती पैसे देणार नसेल तर त्यास रिकाम्या हाती पाठवले पाहिजे; परंतु सवानाला ही गोष्ट न पटणारी होती. तिचे विचार वेगळे होते. सबवेचा व्यवसाय हा लोकांना खुश करण्यासाठी आहे. मी हेच करते, असे तिला वाटायचे. सवानाने नोकरी सोडताना सबवेच्या ऑफिशियल फेसबुकच्या पेजवर पोस्ट केले. त्यात तिने सर्व हकीकत मांडली होती....
मी काही महिने सबवेच्या आउटलेटमध्ये नोकरी केली होती; परंतु मी आता ही नोकरी सोडली. त्याचे कारण म्हणजे..एक दिवस एक बेघर व्यक्ती आउटलेटमध्ये आला आणि त्याने १० डॉलरहून महागड्या सँडविचची मागणी केली. माझ्या सहकाऱ्याने त्यास नकार दिला. तो टोकन काउंटरजवळ पोहोचला आणि वेड्यासारखे सँडविच शोधू लागला. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर लाजिरवाणे भाव आले. तो बाहेर जाऊ लागला. परंतु मी त्याला थांबवले आणि मी सँडविचचे पैसे देईन, असे सांगितले. त्यानुसार मी क्रेडिट कार्डने त्याचे पेमेंट केले. तेदेखील कोणत्याही डिस्काउंटशिवाय. ताे खाऊन तृप्त झाला आणि जाताना त्याने मला धन्यवाद दिले. तेथे उभ्या असलेल्या एका ग्राहकाने माझ्या सहृदयतेबद्दल कौतुक केले. सगळे निघून गेले. मग आम्ही साफसफाईच्या कामाला लागलो. त्या वेळी व्यवस्थापकाने मला बोलावून घेतले आणि झापले. एखाद्याकडे खाद्यपदार्थ खरेदीसाठी पैसे नसतील तर त्यास बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. तो भुकेला होता. त्यातही उष्णता. मग त्याला तसेच कसे पाठवणार? पोटातील भुकेचा दाह तो सहन करत होता. ते पाहून मला विचित्र वाटले. म्हणून मी त्या व्यक्तीची मदत करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक लोकांसाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी हा व्यवसाय असल्याचे मला वरिष्ठांकडून वारंवार सांगण्यात आले आहे; परंतु या घटनेनंतर मात्र मला ज्यांची घरे नसतात. ते माणसे नाहीत, याची जाणीव झाली. बस, हाच विचार मनात घोळत राहिला आणि नोकरीला शेवटचा रामराम ठोकला.