आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमध्ये ; टॅटू काढल्यामुळे तरुणाला अटक, पोलिसांनी ठरवला गुन्हा, न्‍यायालयाने आकारला दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जगभर सध्या शरीरावर गोंदण्याची (टॅटू) फॅशन चालत आहे. भारतासारख्या देशात हा परंपरेचा भाग आहे. बहुतांश लोक टॅटूला कला मानतात, मात्र जपानचे न्यायालय याच्या बाजूने नाही. तिथे यासाठी डॉक्टरांप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनरच्या परवान्याची आवश्यकता आहे. ओसाका न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला. एका प्रकरणात येथील एका टॅटू स्टुडिओ चालवणाऱ्या  ताइकी मसुदाला पोलिसांनी अटक केली होती. त्यावर न्यायालयाने त्याला दंडही ठोठावला होता. मात्र, २९ वर्षे वयाच्या मसुदाने दंड भरण्याऐवजी त्यास आव्हान दिले. २०१५ मध्ये पोलिसांनी स्टुडिओवर छापा टाकून मसुदास अटक केली होती. मसुदा कोणत्याही वैद्यकीय शिक्षणाशिवाय टॅटू स्टुडिओ चालवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. न्यायालयाच्या निकालात त्याच्यावर ३ लाख येनचा(सुमारे दीड लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला. मात्र, मसुदाने टॅटू रक्षणाचे अभियान सुरू केले आणि दंडाविरुद्ध ओसाकाच्या कोर्टात आव्हान दिले. टॅटू एक कला असून तो काढणारा कलाकार असल्याचा युक्तिवाद त्याने केला. याचा वैद्यकशास्त्राशी काहीही संबंध नाही. मात्र, न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य न धरता टॅटू मेडिकल प्रॅक्टिस ठरवत परवान्याची आवश्यकता व्यक्त केली. यासोबत त्याला दीड लाख येनचा दंड ठोठावला.  न्यायाधीश तकाकी नगासे म्हणाले, टॅटू काढताना जिवाणू व विषाणू शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे टॅटू काढणाऱ्याकडे वैद्यकीय परवाना असायला हवा.  

भारतात १३०० कोटींचा उद्योग
भारतात टॅटू काढणे परंपरेचा भाग आहे. मात्र, आता तो मोठा व्यवसाय आहे. भारतात २५ हजारांहून जास्त टॅटू स्टुडिओ असून टॅटू उद्योगातील उलाढाल १३०० कोटी रुपयांहून अधिक आहे.  
 
जपानमध्ये टॅटू काढणारी व्यक्ती गुन्हेगारी जगताशी संबंधित मानली जाते  
जपानमध्ये टॅटू बदनाम आहे. याचा संबंध तिथे गुन्हेगारी जगताशी जोडला जातो. अनेक ठिकाणी स्विमिंग पूल, गरम पाण्याचे कुंड व बारमध्ये शरीरावर टॅटू असणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. २०१४ मधील सर्वेक्षणात जपानच्या ९०% लोकांनी टॅटूची भीती वाटत असल्याचे म्हटले होते.  आता मात्र बदल दिसत असून जपानी तरुणाईमध्ये टॅटूची फॅशन वाढत आहे. येथील २० ते ३० वर्षांचे ४०%  तरुण टॅटूला कूल आर्ट व फॅशन मानतात.
बातम्या आणखी आहेत...