आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 % लोकांच्या स्वप्नात शाळा आणि पुस्तके : कॅलिफोर्नियाचे शास्त्रज्ञ डॉ. केली बुलकेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्कले (अमेरिका) : तुम्ही कधी स्वप्नात परीक्षेत नापास झाला आहात किंवा जखमी झाला आहात? लग्न समारंभात सहभागी झालात का? स्वप्ने पडण्याची अशी काही उदाहरणे. प्रत्येक जण झोपेत स्वप्न पाहत असतो. मात्र, सर्वाधिक पाहिली जाणारी स्वप्ने कोणती?
या सार्वत्रिक उत्सुकतेच्या प्रश्नावर अमेरिकी शास्त्रज्ञाने डेटाबेस तयार केला आहे. त्यात जगभर सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या स्वप्नांचा समावेश केला आहे. त्यात ८५ टक्के नागरिक स्वप्नात शाळा, शिक्षक व अभ्यासाशी संबंधित वस्तू पाहत असल्याचे समोर आले आहे. पुरुष जी स्वप्ने पाहतात तशीच स्वप्ने स्त्रिया पाहतात. स्वप्न पाहणे सुखद बाब असल्याचे संशोधनात पुढे आले.
कॅलिफोर्नियातील बर्कलेचे रहिवासी डॉ. केली बुलकेली यांनी डेटाबेस तयार केला. झोप व स्वप्न नावाने अभ्यास केला आहे.

कुणाचा हल्ला होणे किंवा हुसकावणे : महिला आणि पुरुष सर्वाधिक स्वप्ने पाहतात. लहानपणी ती सर्वात जास्त पडतात. ही स्वप्ने भीतिदायक असतात.

शाळा, शिक्षक व अभ्यास : औपचारिक शिक्षण घेणारे लोक अशी स्वप्ने पाहतात. ही स्वप्ने शिक्षण सोडल्यानंतरही बरेच दिवस पडतात. भविष्यावर विश्वास असणारे सर्वात जास्त अशी स्वप्ने पाहतात. संशोधनामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
लैंगिक संबंध : पुरुष स्त्रियांपेक्षा अशी स्वप्ने जास्त पाहतात. बायोलॉजिक व सेक्सुअल महत्त्वाकांक्षा पूर्ण न होणे हे त्यामागचे कारण आहे.

एखाद्या ठिकाणाहून पडणे : मेंदूचे न्यूरोमीटर्स एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर स्थलांतरित होतात तेव्हा असे स्वप्न पडते. जीवनात काही बदल झाला किंवा प्रभावित झाल्यावर ही स्थिती येते.
वारंवार एखादे काम करणे : अर्धवट विचारात झोप लागल्यावर असे स्वप्न पडते. तणाव असतो तेव्हा अशी स्थिती येते.

सर्वात जास्त पाहिले जाणारे स्वप्न
स्वप्न महिला पुरुष एकूण
हल्ला व पळणे ७८ ७७ ८३
शाळा, शिक्षक, अभ्यास ८५ ७१ ७८
लैंगिक सुख ५८ ८५ ७२
पडणे ७३ ६९ ७१
वारंवार एक काम करणे ६० ६७ ६४
भीतीने थंड पडणे ६३ ५७ ६०
उशिरा येणे ६२ ५६ ५९
जिवंत व्यक्तीचा मृत्यू ६३ ४५ ५४
आवडीचे जेवण ५२ ४८ ५०
परीक्षेत नापास ५० ३९ ४५
बातम्या आणखी आहेत...