आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंशभेदी प्रवृत्तींना ट्रम्प बळकटी देत असल्याचा जनतेचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील प्रमुख नेत्यांपैकी केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनीच शॅरलट्सव्हिलविरोधी निदर्शनांचे समर्थन केले. यामुळे आठवडाभर गोळीबार व चकमकी झाल्या. श्वेतवर्णीय राष्ट्रवाद्यांनी कू क्लूक्स आंदोलनाची आठवण यानिमित्ताने करून दिली. नाझींची घोषणा ‘ब्लड अँड सॉइल’ला पुन्हा एकदा या श्वेतवर्णीयांनी जिवंत केले. हे पर्व १९४५ मध्ये संपले होते. त्यांनी यात आणखी एक आेळ जोडली, ज्यू आमची जागा घेऊ शकत नाहीत. अप्रत्यक्ष रूपात ही श्वेतवर्णीयांच्या राष्ट्रीय ऐक्याची घोषणा होती. मात्र, ट्रम्प यांच्या मते, फुटीरतावादी, फॅसिस्ट आणि वंशभेदी लोकांमध्ये काही योग्य भूमिका असलेले लोकही होते. रॉबर्ट ई ली यांचा पुतळा हटवल्याने त्यांनी विरोध दर्शवल्याचे ट्रम्प म्हणतात.
 
रॉबर्ट यांचा पुतळा हटवणे चूक असून त्यामुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती खोडली जात असल्याची त्यांची भावना आहे. लोक पुढच्या वेळी जॉर्ज वॉशिंग्टन यांचा पुतळा हटवण्याची मागणी करू शकतात. १५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत ट्रम्प म्हणाले की, अशा मागण्यांचा काही अंत नसतो. मात्र, अमेरिकी जनतेलाही याविषयी राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारायचा आहे; नुकत्याच घडलेल्या घटनांचा अंत केव्हा होणार? हिंसेमध्ये ३२ वर्षीय हीथर हेअरचा जीव गेला. ३० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. कट्टरवाद्यांनी केलेल्या हिंसेमुळे श्वेतवर्णीयांना आपल्या शक्तिप्रदर्शनाची संधी गेल्या दशकभरात प्रथमच मिळाली. राष्ट्राध्यक्ष मात्र त्यांचेच समर्थक आहेत. अप्रत्यक्षरीत्या ट्रम्प घृणा पसरवणाऱ्या शक्तींचे समर्थन करत आहेत. त्यांनी वंशवाद, कट्टरवादावर टीका केली. मात्र, विरोध करणाऱ्या उदारमतवाद्यांना त्यांनी हिंसेस जबाबदार ठरवले.   
 
ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे व्हाइट हाऊस प्रशासनाचे हिंसा थांबवण्याचे प्रयत्न निष्प्रभ ठरले. अमेरिकेच्या एकात्मतेसाठी राष्ट्राध्यक्ष काम करतील, या आशाही यामुळे मावळल्या. अमेरिकेत कधीही राष्ट्रीय आपत्ती आली तर तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी त्यानिमित्ताने राष्ट्राच्या एकजुटीसाठी प्रयत्न केले आहेत. चॅलेंजर स्फोटानंतर रोनाल्ड रेगन, आेक्लाहोमामध्ये स्फोटानंतर बिल क्लिंटन, ९/११ नंतर जॉर्ज बुश आणि चार्ल्सटन चर्चमध्ये गोळीबारानंतर बराक आेबामा या सर्वांनी एकजुटीचे प्रयत्न केले. मात्र, ट्रम्प यांना घटनास्थळी जाण्याविषयी विचारले गेले तेव्हा त्यांनी खिल्ली उडवत दुरुत्तर केले. विरोधकांसह रिपब्लिकन पक्षातील समर्थकांनीही त्यांच्यावर टीका केली. मात्र, ट्रम्प यांची ही कार्यशैली राहिली आहे. व्यावसायिक लाभासाठी त्यांनी वंशभेदी आणि धार्मिक भेदांचा फायदा घेतला होता. धार्मिक मतभेद कमी करण्यासाठी सांस्कृतिक परंपरांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नसावे, असे मानले जाते. मात्र, ट्रम्प यांना राजकीयदृष्ट्या ते योग्य वाटते. आपल्या निवडणूक प्रचारात त्यांनी वारंवार वंशभेदी वक्तव्ये केली. मुस्लिमांची तुलना विषारी सापांशी केली. आज पदावर असताना ते याचे केवळ समर्थक नसून वंशभेदाला प्रोत्साहन देत आहेत.  
 
त्यांचे जुने राजकीय सहकारी रॉजर स्टोन म्हणतात की, राजकारण म्हणजे लोकांना एकजूट ठेवणे नव्हे. त्यांच्यामध्ये फुट पाडली पाहिजे. त्यामुळेच ५१% बहुमत मिळते. असेच ध्येय श्वेतवर्णीय राष्ट्रवादी आंदोलनांचे आहे.  
वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि आपल्या स्वभावात ताळमेळ बसवण्यास ट्रम्प अपयशी ठरत आहेत. सहकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर ते काही काळ आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवतात, मात्र पुन्हा त्यांची बेछूट वक्तव्ये सुरू होतात. श्वेत राष्ट्रवादी आंदोलकांना त्यांचे हे बोलणे रुचते.  
 
अमेरिकेत द्वेष पसरवणाऱ्यांमध्ये सुशिक्षित तरुण वर्ग आहे. इंटरनेटवर ट्रॉलिंगद्वारे ते हे काम करतात. अति उजव्या विचारसरणीचे हे छोटे-छोटे गट आहेत. ऑनलाइन जगात ते कटु भाषेत चर्चा करतात. मात्र, सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनपुढे यांची धाव नाही. हे गट युरोपीय फॅसिस्टवादी संघटन जसे- ग्रीसमधील गोल्डन डाऊन, नॉर्डिक रेझिस्टंट मूव्हमेंट आणि रुरी विचारवंत अलेक्झांडर डगिन यांनी प्रेरित आहेत. अलेक्झांडर डगिन हे व्लादिमीर पुतीन यांचे निकट सहकारी आहेत. अमेरिकेत श्वेतवर्णीय नोकरवर्गात होणारी घट हे यांच्या संतापाचे मुख्य कारण आहे. ट्रम्पदेखील या मुद्द्यावर ठाम आहेत. शॅरलट्सव्हिल या समूहांसाठी एक संधी होती. या अर्थाने आंदोलन यशस्वी झाले. ब्लॅक लाइव्स मॅटर मूव्हमेंट आणि मायकल ब्राऊन तसेच ट्रेवन मार्टिनच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांची झळ बसल्याचे यांचे म्हणणे होते. शॅरलट्सव्हिलच्या रॅलीचे आयोजक जॅसन कॅसलर युनिटी अँड सिक्युरिटी नावाचा गट चालवतात. अप्रवासी धोरणाचे त्यांनी समर्थन केले होते. सहकाऱ्यांमध्ये वेनगार्ड अमेरिका, हा अमेरिकी फॅसिस्टवादाचे प्रतिनिधित्व करतो तसेच आयडेंटिटी एव्हरोपा गटांचा समावेश आहे. परंपरावादी वर्कर पार्टीचा यात सहभाग होता. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी यावे, अशी या सर्व पक्षांची इच्छा होती.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉरेन्स रोसेंथल यांनी म्हटले की, या पक्षांना आपला प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षपदी हवा होता.  २०१५ च्या अखेरीस त्यांनी आपल्या राजकीय यशाची दोन कारणे सांगितली होती- स्थलांतरित आणि दहशतवाद. निवडणूक अभियानातदेखील त्यांनी या मुद्द्यांवर भर दिला.  
ट्रम्प यांची वागणूक रिपब्लिकन पक्षाच्या परंपरागत पद्धतींनुसार नाही. पक्ष गेल्या दोन पिढ्यांपासून कट्टरवादापासून दूर राहिला. पक्षाचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन, जॉर्ज बुश यांनी स्वातंत्र्य व समतेविषयी आग्रही भूमिका घेतली. पक्षासोबत ट्रम्प यांचे संबंध त्यांच्यासारखे नाहीत. पक्षाच्या परंपरांना ते मोजतही नाहीत.  
 
वंशभेदी प्रवृत्तींसाठी ही संधी आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षातील सदस्य ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. श्वेत राष्ट्रवाद्यांना ट्रम्प प्रोत्साहन देत असल्याविषयी त्यांना आक्षेप आहे. ट्रम्प यांच्यावर रिपब्लिक पक्षात पूर्वीही टीका झाली होती. मात्र, निवडून आल्यानंतर लोकप्रिय नेत्याशी वाद टाळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ट्रम्प यांची लोकप्रियता घटत असली तरीही कट्टरवाद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्लल त्यांना कोणतीही शिक्षा दिली गेली नाही.
ट्रम्प यांचे व्हाइट हाऊस प्रशासनाशी संबंधही कटू असल्याने अनेक राज शिष्टाचारांचे वारंवार उल्लंघन होत आहे. त्यांच्या पक्षात आणि प्रशासनातही त्यांच्यावर टीका सुरु आहे.

श्वेतवर्णीयांसाठी संधी नसल्याने चिंता
अमेरिकेतील २८% लोकांचे म्हणणे आहे की, अल्पसंख्याकांमुळे श्वेतवर्णीयांना मिळणाऱ्या संधींत घट होते. अल्पसंख्याकांसाठीच्या संधीही कमी होत आहेत. मात्र, ही समस्या नाही. ट्रम्प यांच्या कट्टर समर्थकांपैकी ४६% सदस्यांना संधीची कमतरता ही सर्वात मोठी समस्या वाटते.
बातम्या आणखी आहेत...