कला ही विविध रुपांमधून व्यक्त केली जात असते. पण तसे असले तरी कोणत्याही कलेसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर कल्पकता असणे हे गरजेचेच असते. तसे असेल तरच कलाकाराला त्याला हवी तशी कलाकृती साकारण्यात यश मिळते. पण पेन्सिलच्या टोकावरही अशा प्रकारची काही कलाकारी करता येऊ शकते असा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही ना मग पाहा या अवलियाचा अफाट कलाविष्कार
प्रसिद्ध शिल्पकार डाल्टन घेत्ती यांचा पेन्सिलच्या टोकावरील कलाविष्कार पाहून बोस्निया येथील जेसेन्को दोरदेविक चांगलाच भारावून गेला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जेसेन्को यानेही पेन्सिलच्या टोकावर कलाकारी करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांनी पेन्सिलच्या टोकावर एकापेक्षा एक सरस अशी शिल्पे साकारायला सुरुवात केली. जगातिल प्रसिद्ध इमारतींपासून ते विविध आकार ते पेन्लिच्या टोकावर सहज उतरवू लागले. त्यांच्या अशाच काही कलाकृती आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा पेन्सिलच्या टोकावर साकारलेली काही अशीच शिल्पे...