आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्रतिम... विविध देशांची संस्कृती दर्शवणाऱ्या कलाकृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानच्या तोशिहिको होसाका यांच्या कलाकृती कलारसिकांसाठी नेहमीच आकर्षक ठरतात. त्यांनी विविध देशांच्या संस्कृतीवर आधारित अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. जगभरात त्यांचे कौतुकही झाले आहे. होसाका यांनी समुद्र किनाऱ्यावरील वाळूपासून तयार केलेल्या कलाकृती सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. ४३ वर्षीय होसाका यांची कला क्षेत्रातील कारकीर्द २० वर्षांपेक्षा अधिक असली तरी ते फार चर्चेत नाहीत.

२०१० मध्ये चीनच्या झाउशान शहरात वाळू शिल्पांचा महोत्सव सुरू होता. तेथे बनलेल्या लहान लहान कलाकृतींवरून प्रेरणा घेऊन होसाका यांनी याच कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना या कामासाठी विविध देशांत जाण्याची संधी मिळाली. होसाका म्हणतात, एखादी कलाकृती हाती घेतल्यावर संपूर्ण दिवस किंवा कित्येक दिवस कधी निघून जातात हे कळतही नाही. कधी कधी खूप थकवा येतो. मात्र, प्रेक्षक आपल्या कलाकृतीला दाद देतात, तेव्हा या थकव्याचे काहीच वाटत नाही. सध्याच्या तंत्रज्ञान प्रगतीच्या युगाच्या तुलनेत वाळूची शिल्पे फार कमी काळ टिकतात. वाळूचा बाहेरील थर पक्का करणारा स्प्रेदेखील तयार करण्यात आला आहे.
 }spoon-tamago.com
 
बातम्या आणखी आहेत...