आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे म्यानमारचा बिन लादेन, या देशातील मुस्लिमांमध्ये दहशत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंसाचार, भडकाऊ भाषणांसाठी कुप्रसिद्ध... - Divya Marathi
हिंसाचार, भडकाऊ भाषणांसाठी कुप्रसिद्ध...
इंटरनॅशनल डेस्क - म्यानमारच्या उत्तर-पश्चिम भागात गेल्या कित्येक वर्षांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा नरसंहार सुरू आहे. नुकताच हा हिंसाचार पुन्हा उफाळून आला असून यात रोहिंग्या मुस्लिम समुदायाच्या जवळपास हजारो घरांना आग लावण्यात आली. 60 हजार रोहिंग्या आपला जीव वाचवण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये पलायन करत आहेत. अजुनही म्यानमारचा हा हिंसाचार थांबलेला नाही. या हिंसाचारात म्यानमारचा कट्टरपंथी बौद्ध भिख्खू अशीन विराथु याचे नाव चर्चेत आहे. रोहिंग्या मुस्लिमांचा विरोध करताना ज्या-ज्या ठिकाणी हिंसाचार घडवला जात आहे किंवा निदर्शने केली जात आहे, त्या प्रत्येक ठिकाणी या कट्टरपंथियाचा फोटा दाखवला जात आहे. त्याला म्यानमारचा लादेन सुद्धा म्हटले जाते. 
 

हिंसाचार, भडकाऊ भाषणांसाठी कुप्रसिद्ध
- 1968 मध्ये जन्मलेला अशीन विराथु 14 व्या वर्षीच भिख्खू बनला होता. 
- यानंतर विराथु 2001 मध्ये कट्टर राष्ट्रवादी आणि मुस्लिम विरोधी गटाच्या संपर्कात आला. तेव्हापासूनच तो जगभरात कुप्रसिद्ध झाला आहे. 
- देशभर रोहिंग्या मुस्लिमांविरोधात हिंसाचारासाठी भडकाऊ भाषणे देण्याचा त्याच्यावर आरोप आहे. 
- रोहिंग्या मुस्लिमांच्या हिंसाचारात नेहमीच त्याचे नाव घेतले जाते. 2003 मध्ये त्याला जातीय हिंसाचारासाठी 25 वर्षांची कैद सुनावण्यात आली. मात्र, 2010 मध्येच इतर कैद्यांसह त्याला देखील सोडण्यात आले. 
- साल 2012 मध्ये रॅखीन प्रांतात मुस्लिम विरोधी हिंसाचार उसळला तो विराथू यानेच भडकावला होता असे आरोप लागले आहेत. 
- यानंतरच त्याचे नाव म्यानमारचा बिन लादेन असे पडले. विराथू सोशल मीडियावर सुद्धा अॅक्टीव्ह आहे. त्याचे 45 हजारांहून अधि फॉलोअर्स आहेत. त्याला एका इंटरव्यूमध्ये तू खरोखर स्वतःला म्यानमारचा बिन लादेन मानतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने होकारात याचे उत्तर दिले होते.
 
 
कोण आहेत रोहिंग्या मुस्लिम?
- रोहिंग्या मुस्लिम प्रामुख्याने म्यानमारच्या अराकान प्रांतात वसलेला अल्पसंख्याक समुदाय आहे.
- त्यांना काही शतकांपूर्वी अराकन प्रांतात मोगलांनी वसवले होते. 1785 मध्ये म्यानमारच्या या प्रांतावर बौद्धांनी नियंत्रण मिळवले. त्यांनी हजारो रोहिंग्यांची कत्तल करून उर्वरीत रोहिंग्यांना इतरत्र हकलून दिले. 
- तेव्हापासूनच रोहिंग्या मुस्लिम आणि बौद्ध समुदायात हिंसाचार सुरू झाला. 
अद्याप नागरिकत्व नाही.
- म्यानमारमध्ये गेल्या कित्येक शतकांपासून 10 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिम वास्तव्य करत आहेत. मात्र, म्यानमार सरकारने त्यांना अद्याप नागरिकत्व दिलेले नाही. 
- या लोकांना देशच नाही असे म्हटले जाते. सुरुवातीपासूनच त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. 
- गेल्या कित्येक वर्षांपासून होणाऱ्या दंगलींमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या घरांना आग लावून नरसंहार केला जातो. 
- त्यापैकी काहींना बांगदेश आणि थायलंडमध्ये त्यांना तात्पुरत्या शिबीरांमध्ये आश्रय देण्यात आला आहे. एकट्या बांगलादेशच्या सीमेवर 3 लाख रोहिंग्या मुस्लिम शरण घेऊन आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराथु आणि रोहिंग्या मुस्लिमांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...