आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुवेतने इराणमधून राजदूताला बोलावले; दूतावास सुरक्षेत नियमांचे उल्लंघन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेत सिटी- सौदी अरेबियाने शिया धर्मगुरूला मृत्युदंडाची शिक्षा दिल्यानंतर सुन्नी शिया बहुसंख्य देशांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी कुवेतने इराणमधील आपल्या राजदूताला माघारी बोलावले. परिणामी मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. असे असले तरी कुवेतने इराणच्या राजदूताला मायदेशी जाण्यास सांगितले नाही. सुन्नीबहुल सौदी अरेबिया आणि बहरिनने या आठवड्यात इराणसोबतचे राजकीय संबंध संपुष्टात आणल्यानंतर कुवेतने हे पाऊल उचलले आहे.

ओमान आणि कतारव्यतिरिक्त बहरिन, कुवेत, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात आखाती देशांच्या सहकार्य परिषदेचे सदस्य आहेत. अन्य देशांच्या दूतावासाची आणि मुत्सद्द्यांना सुरक्षेत इराणने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे,असे परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने कुना वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात इराणसाठी हेरगिरीचा प्रयत्न उद्ध्वस्त केल्यानंतर कुवेत आणि इराणमधील संबंध चांगले होते.
सौदीच्यामानवी हक्काच्या रेकॉर्डवर अमेरिका चिंतित : वॉशिंग्टन| अमेरिकेने सौदी अरेबियातील मानवी हक्काच्या प्रकरणांवरून चिंता व्यक्त केली आहे. धर्मगुरू आणि राजकीय नेत्यांना नुकत्याच दिलेल्या मृत्युदंडामुळे आखाती देशांचे आंतरराष्ट्रीय समुदायाने व्यक्त केलेल्या चिंतेकडे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या प्रमाणात सामूहिक मृत्युदंड देण्याची घटना ही आंतरराष्ट्रीय समुदायाकडे डोळेझाक करण्याचे उदाहरण आहे, असे व्हाइट हाऊसने सांगितले. अमेरिकेने सौदी अरेबियाच्या मानवी हक्काच्या गळचेपीची माहिती दिली आहे. सौदी अरेबियाने वारंवार दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेनंतर पाश्चात्त्य देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

सौदीने संबंध तोडल्या परिणाम होणार नाही
शिया धर्मगुरू नीर यांच्या शिक्षेविरुद्ध बगदादमधील सौदी दूतावासासमोर शियापंथीयांनी निदर्शने केली.
तेहरान सौदीअरेबियाने राजकीय संबंध संपुष्टात आणले तरी त्याचा इराणच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. मोहंमद बघेर नोबख्त म्हणाले, सौदीच्या समर्थनार्थ बहरिन, सुदानने इराणशी संबंध तोडले. अन्य अरब देशांनी राजदूत बोलावले आहेत.
बातम्या आणखी आहेत...