आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्ये आशियाईंची सर्वात वेगाने वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत आशियाई लोकांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. जुलै २०१४ ते २०१५ दरम्यान लोकसंख्येत ३.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक चिनी आहेत. चीनने मेक्सिकोला पिछाडीवर टाकले आहे.

अमेरिकेच्या जनगणना विभागाकडून गुरूवारी जाहीर करण्यात आली. अमेरिकेतील आशियाई लोकांची संख्या आता २.१ कोटींवर पोहचली आहे. हवाई प्रांत तर संपूर्णपणे आशियाई वंशाच्या लोकांचा प्रदेश बनला आहे. जनगणना विभागाचे अधिकारी सॅम गॅरो गुरूवारी म्हणाले, २००० नंतर आशियाई अमेरिकेतील वेगाने वाढणारा समुदाय ठरला आहे. २०१३ मध्ये जगभरातून येणाऱ्या समुदायांपैकी सर्वात महत्वाचा समुदाय देखील ठरला आहे. दुसरी मोठी संख्या संमिश्र वंशाच्या समुदायाची आहे. ही लोकसंख्या ६६ लाखांवर आहे. त्यात ३.१ टक्क्यांनी वाढली आहे. हा समुदाय सर्वात तरूण आहे. त्याचे सरासरी वय २० वर्षे आहे.

गोऱ्यांची संख्या १९.८० कोटी आहे. त्यांची लाेकसंख्या ०.१ टक्क्यांनी वाढली आहे. इतर समुदायांच्या तुलनेत स्वत:ला गोरे मानणाऱ्यांची संख्या २५.५ कोटी आहे. त्यांची संख्या ०.५ टक्क्यांनी वाढली आहे.

काही रंजक वैशिष्ट्ये
- कॅलिफोर्नियात सर्वाधिक वांशिक व जातीय समुदाय.
- न्यूयॉर्कच्या प्रांतात कोणत्याही राज्यापैकी सर्वाधिक कृष्णवर्णीय.
- हवाई द्विप समुहात सर्वाधिक स्थानिक निवासी.
- सर्वाधिक श्वेतवर्णीय कॅलिफोर्नियात राहतात.
- इतर राज्यांच्या तुलनेत श्वेतवर्णीय समजणाऱ्यांची संख्या २.९८ कोटी कॅलिफोर्नियात.
बातम्या आणखी आहेत...