आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियातील 85% भूप्रदेशावर असद सरकारचे वर्चस्व स्थापित; रशियाच्या लष्कराने दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमेमीम एअरबेस - सिरियातील ८५% भूप्रदेशावर सरकारचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचा दावा रशियाने केला आहे. दहशतवाद्यांची येथून हकालपट्टी झाली असून हा प्रदेश आता युद्धग्रस्त नाही. लेफ्ट. जन. अलेक्झांडर लापिन यांनी हेमेमीम एअरबेसवर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे वायुदल स्थानक सिरियातील सागरकिनाऱ्यावर असलेल्या लाटाकिया शहरात आहे. अद्याप १५% भागात दहशतवाद्यांचे वर्चस्व आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशिया कुमक पुरवत आहे. २०१५ पासून रशिया इसिसविरुद्ध लढ्यात असद सरकार समर्थक फौजांना वायुदल साहाय्य करत असल्याचे लापिन म्हणाले. सिरियन फौजांना इराणी सैन्यदलांचीही मोठी मदत झाली. लेबनॉन सीमेजवळ असलेल्या दहशतवादी स्थानकांना आणि पूर्वेकडील तेलसंपन्न डेर-अल-इझार येथून इसिस दहशवाद्यांना हाकलून देण्यात इराणी सैन्यदलाची मदत होत आहे.  
रशियन, अमेरिकी हवाई हल्ल्यांमध्ये डेर इसारमधील २८ नागरिक ठार  
असद समर्थक फौजांसह रशिया तसेच अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या फौजांनी तेलसंपन्न डेर -अल- इझारवर हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत.  या विविध हल्ल्यांमध्ये येथील २८ निरपराध नागरिकांचा बळी गेल्याचे मानवाधिकार संघटनेने सांगितले. पूर्वेकडील डेर इसारमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी तळ ठोकला आहे. अमेरिकी वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील १२ सदस्यांचा बळी गेला. पैकी ५ लहान मुले होती. युफ्रेटिस नदीकिनाऱ्याच्या प्रदेशात अमेरिकेने हवाई हल्ले केल्याचे ब्रिटनच्या मानवाधिकार संघटन सूत्रांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...