आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे तयार होते धोकादायक रायफल AK-47, पाहा फॅक्टरीचे आतील PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाच्या इझेव्स्क शहरातील या फॅक्टरीत तयार होते एके-47 रायफल. - Divya Marathi
रशियाच्या इझेव्स्क शहरातील या फॅक्टरीत तयार होते एके-47 रायफल.
इझेव्स्क - असॉल्ट रायफल एके-47 जगात प्रसिध्‍द आहे. सर्वजण तिच्या वैशिष्‍ट्यांशी परिचित आहेत. याची रशियाचे(विघटनेपूर्वी सोव्हिएत संघ) लेफ्टनण्‍ट जनरल मिखाइल कलाश्‍निकोवने विकसित केले होते. 6 जुलै 1947 मध्‍ये हे असॉल्ट रायफल बनवण्‍यात आले होते. ब्लॉगर वारलामोव झाल्टने गेल्या वर्षी रशियाच्या इझेव्स्क शहरात असलेल्या एके-47 बनवणा-या फॅक्टरीला भेट दिली व तिचे छायाचित्रे शेअर केली. दुस-या महायुध्‍दानंतर सुरु झाले उत्पादन...
- कलाश्निकोव कन्सर्न एके-47 बनवणारी रशियातील सर्वात जुनी कंपनी आहे. इझेव्स्कमध्‍ये या कंपनीचे मुख्‍यालय आहे.
- हे रायफल डिझाइन करणारे मिखाईल कलाश्निकोवही इझेव्स्क शहराचे रहिवाशी होते. येथे ही फॅक्टरी आहे.
- फॅक्टरीत याच्या वेगवेगळ्या भागाचे उत्पादन यंत्राऐवजी हातांनी केली जाते.
- नंतर हे भाग आगीत तापवून जोडले जातात.
- याचे उत्पादन सोव्हिएत संघाच्या काळापासून झाले. मात्र सध्‍या अनेक देशांमध्‍ये याचे उत्पादन केले जात आहे.
- कलाश्निकोव कन्सर्न एके-47 बनवण्‍यासाठी जगात प्रसिध्‍द आहे.
- पूर्ण जगाच्या लष्‍करी बाजारपेठेत रशियाचे नेतृत्व करते.
- या फॅक्टरीत स्नायपर रायफल, विमान आणि हेलिकॉप्टर्समध्‍ये बसवण्‍यात येणा-या बंदूकींचे उत्पादन केले जाते.
- फॅक्टरी जवळ याचे परीक्षण केंद्रही आहे.
केव्हा सुरु झाले उत्पादन?
- सोव्हिएत संघाच्या कागदपत्रांनुसार या आट्वोमेट कलाश्निकोवच्या नावाने ओळखले जाते.
- रशियात हे कलाश्निकोव व एके-47 या नावाने प्रसिध्‍द आहे.
- दुस-या महायुध्‍दाच्या (1945) शेवटी एके-47 च्या डिझाइनवर काम सुरु झाले होते.
- 1946 मध्‍ये युध्‍द संपल्यानंतर एके-47 लष्‍कराच्या चाचणीसाठी बनवले होते.
- 1949 मध्‍ये सोव्हिएत लष्‍करात एके-47 सामील होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)