आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियात चर्चचे छत कोसळून १६० जण ठार, मृतांत भाविकांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॅरी - नायजेरियाच्या दक्षिणेकडील एका चर्चचे छत काेसळून किमान १६० जणांचा झाल्याची घटना युयो शहरात घडली. मृतांत भाविकांचा समावेश आहे. चर्चमध्ये भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रिगनर्स बायबल चर्चमधील ही घटना आहे. चर्चचे बांधकाम अद्यापही अपूर्णावस्थेत असून प्रार्थनेसाठी मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी लोटालोटी व गोंधळामुळे छत कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या अगोदर २०१४ मध्ये बहुमजली इमारत कोसळली होती. त्यात ११६ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना इमारतीमधील बांधकामातील त्रुटीमुळे घडली होती. चर्चच्या घटनेमागील कारणांचाही शोध घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा... भ्रष्ट्राचार आणि लाचखोरीमुळे फोफावला अवैध कंस्ट्रक्शनचा धंदा
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...