आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कस्तान : आत्मघातकी स्फोटात 30 ठार 100 जखमी, पाहा घटनेचा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा - तुर्कस्तानच्या सुरुच शहरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 30 जण ठार झाले आहेत, तर सुमारे 100 जण जखमी आहेत. हल्लेखोराने स्वतःला स्फोटाद्वारे उडवून दिले. सुरुच-सिरिया बॉर्डरला लागून असलेले हे कुर्दीश बहुत शहर कोबानी जवळच आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, ISISI ने हा हल्ला घडवल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

20 जण गंभीर
सुरुच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अब्दुल्ला सिफ्तसी यांनी हल्ल्यात 30 जण ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींपैकी जदवळपास 20 जणांची स्थिती अधिक गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. स्फोटापूर्वी अनेक लोक बॅनर घेऊन घोषणाबाजी करत असल्याचे दिसते. त्यानंतर काही क्षणांतच स्फोट होतो आणि एकच आरडा ओरड सुरू होते. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याचे समजते आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती तय्यिप एर्डोगन यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

कल्चरल सेंटरमध्ये होते 300 जण
तुर्कस्तानच्या गृहमंत्रालयाच्या मते बॉम्बस्फोट शहरातील एका कल्चरल सेंटरच्या गार्डनमध्ये झाला. याठिकाणी जवळपास 300 तरुण होते. फेडरेशन ऑफ सोशलिस्ट यूथ असोसिएशन्स (एसजीडीएफ)ने सांगितले की, त्यांचे कमीत कमी 300 सदस्य कोबानीमध्ये रिबिल्डिंग वर्कमध्ये सहभागी होण्यासाठी अमारा कल्चरल सेंटरमध्ये थांबलेले होते. रिपोर्टनुसार हल्ल्यानंतर सर्व फोटो फेडरेशनच्या वतीने ट्विटरवर जारी करण्यात आले आहेत.

कोबानीमधून पळून सुरुचमध्ये येताहेत लोक
गेल्या काही महिन्यांमध्ये कोबानीहून पळून जाणाऱ्या अनेकांनी सुरुचमध्ये आसरा घेतला आहे. 2014 च्या सप्टेंबर महिन्यानंतरपासूनच हे शहर इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आणि कुर्दीश यांच्यातील संघर्षाचे मैदान बनले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्फोटानंतरचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...