आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अॅपद्वारे बोलवा घरपोच एटीएम,पोलंडमध्ये आयडिया बँकेची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वारसा- एटीएममुळे बँकेत जाण्याची आवश्यकता कमी भासत आहे. मात्र, भविष्यात एटीएमपर्यंत जाण्याचीही गरज पडणार नाही. पोलंडच्या आयडिया बँकेने अनोखी योजना सुरू केली आहे. याच्या साहाय्याने बँकेचे मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करणारा ग्राहक घरासह हव्या त्या ठिकाणी एमटीएम व बँकेची प्रत्येक सुविधा मागू शकेल.

या सुविधेसाठी बँकेने अनेक व्हॅनमध्ये एटीएम स्थापन केले आहे. व्हॅन इलेक्ट्रिक पॉवरने चालते. या अॅपच्या माध्यमातून व्यापारी रोजचा गल्ला जमा करण्यासाठी व्हॅनला दुकान, कार्यालयात बोलावू शकतील. म्हणजे पैसे भरण्यासाठीही बँकेत जाण्याची गरज लागणार नाही.

अॅप असे काम करेल
एटीएमचा केव्हा उपयोग करावयाचा आहे, याची माहिती ग्राहकाला अॅपवर द्यावी लागेल. यानंतर एटीएमची कार घरी पोहोचेल. बँकेच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे अनेक कार आहेत. त्याचा उपयोग कार्यालयातून पैसे गोळा करण्यासाठी केला जातो. बँकेचे ८० टक्के ग्राहक पैसे जमा करणे पसंत करतात.

>या सुविधा मिळतील: पोलंडच्या आयडिया बँकेने सुरू केली रंजक सेवा
>एटीएमसह प्रत्येक बँकिंग सुविधा देणार
>अॅपवर वापराचा वेळ आणि ठिकाण निश्चित करावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...