आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला : एकाचे शीर कापून ISIS चा झेंडा फडकावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - दक्षिण-पूर्व फ्रान्सच्या सेंट क्वेंटिन फॅलेव्हर येथील एका गॅस फॅक्टरीमध्ये शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोराने एका व्यक्तीचे शीर कापले. तसेच अनेक लोक जखमी झाल्याची माहितीही मिळाली आहे. प्राथमिक वृत्तानुसार हल्लेखोरांच्या हातामध्ये ISIS (इस्लामिक स्टेट्स) चा झेंडा होता.

स्थानिक वेळेनुसार सकाळी दहाच्या सुमारास हा हल्ला झाला. बीबीसीच्या माहितीनुसार सेंट क्वेंटिन फॅलेव्हरमध्ये एअर प्रोडक्ट्स फॅक्टरीमध्ये अनेक कमी तीव्रतेचे स्फोट झाले. फॅक्टरीमध्ये एका गाडीवर स्वार होऊन काही जणांनी प्रवेश केला. त्यानंतर एक स्फोट झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. फॅक्टरीजवळ एक शीर नसलेला मृतदेह आढळला आहे. गृहमंत्री बर्नाड कॅजेन्यूव्ह त्वरित घटनास्थळी रवाना झाले आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वेल्स यांनी शहराच्या आसपास संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. फ्रान्सच्या सरकारने या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...