आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमधील लष्करी तळावरील हल्ल्यात ३३ जण ठार, मृतांत महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खोस्ट - अफगाणिस्तानातील लष्करी तळावर सोमवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला. एकीकडे तालिबानसोबत शांतता चर्चा सुरू असताना दहशतवादी संघटनेच्या कारवायांमुळे अडथळे येऊ लागले आहेत. मृतांमध्ये २७ नागरिक आणि ६ जवानांचा समावेश आहे.
खोस्ट प्रांतातील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. या तळावर अफगाण आणि परदेशी लष्कराचे जवानही असतात. त्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. इफ्तारच्या काही वेळ अगोदर हा हल्ला करण्यात आला. मृतांत १२ मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. हल्ल्याची जबाबदारी तत्काळ कोणीही स्वीकारली नाही, परंतु तालिबानवर संशयाची सुई आहे. गेल्या आठवड्यात अफगाण सरकारसोबत तालिबानची समोरासमोर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच अफगाण लष्कराला लक्ष्य करण्यात आले आहे. आठवडाभरात स्फोटांच्या घटनांत किमान १२ नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, २०१० मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी लष्करी पेहराव करून याच तळाला लक्ष्य केले होते, परंतु तो हल्ला अयशस्वी ठरला होता.

१ हजारावर ठार
गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पहिल्या चार वर्षांतील हिंसाचारात किमान १ हजार नागरिकांचा मृत्यू झाला, असा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून करण्यात आला आहे.