आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : लॉस एंजल्समधील गुरुद्वाऱ्यात तोडफोड, लिहिले ISIS विरोधी अपशब्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुद्वाऱ्याच्या भिंतीवर लिहिलेला मजकूर. - Divya Marathi
गुरुद्वाऱ्याच्या भिंतीवर लिहिलेला मजकूर.
लॉस एंजल्स - अमेरिकेच्या लॉस एंजल्समधील एका गुरुद्वाऱ्यामध्ये तोडफोड झाली असल्याची माहिती आहे. त्याठिकाणी भिंतीवर ISIS च्या विरोधात शिव्या आणि इस्लामविरोधी नारे लिहिलेले पाहायला मिळाले.

तोडफोडीचे कारण..
- याठिकाणी शीख समुदायाच्या एका नेत्याने याबाबतची शंका व्यक्त केली ही घटना कॅलिफोर्नियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या फायरिंगला प्रत्युत्तर असू शकते.
- कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर अमेरिकेत ISIS च्या विरोधात राग आहे.
- गेल्या आठवड्यात सॅन बर्नार्डिनोच्या कम्युनिटी सेंटरवर फायरिंग जाली होती. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर पाकिस्तानी वंशाचे असल्याचे सांगण्यात आले होते.

हे थांबवायला हवे
मंगळवारी हा हल्ला झाल्याचे समोर आल्यानंतर लॉस एंजल्समधील बुएना पार्क परिसरात शीख गुरुद्वाऱ्याचे अध्यक्ष इंद्रज्योत सिंह म्हणाले की, आम्हाला आमच्या समुदायातील लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता आहे. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर अशा प्रकारचा द्वेष वाढला आहे. हे थांबवायला हवे.

अमेरिकेत शिखांवर का होतात हल्ले...
- अमेरिकन नागरिक शिखांना मुस्लीम समजतात. त्यांच्या पगडीमुळे असे होते.
- 11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत शिखांवर हल्ल्याची 200 हून अधिक प्रकरणे समोर आली होती.
- त्यानंतर शिखांच्या विरोधात अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत.
- अमेरिकेत शिखांची लोकसंख्या सुमारे 5 लाखांच्या आसपास आहे.
- 2014 मध्ये अमेरिकेच्या नॅशनल शीख कॅम्पेनकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आले.
- त्यात 60 टक्के अमेरिकन नागरिकांना शिखांबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे.
- 34 टक्के अमेरिकन नागरिकांना मुस्लीम आणि शीख यांच्यातील फरक माहिती नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबधित PHOTO