आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिसमध्ये शाळेत घुसून शिक्षकावर चाकू हल्ला, हल्लेखोराने घेतले ISIS चे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेचा फाईल फोटो. - Divya Marathi
शाळेचा फाईल फोटो.
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका शिक्षकावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर ISIS या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोराने हल्ला करताना ISIS ची घोषणाबाजी केल्याची माहितीही मिळाली आहे.

हल्लेखोर फरार
- sky.com च्या रिपोर्टनुसार हल्लेखोराकडे धारदार चाकू आणि कैची होती. शिक्षकावर हल्ला केल्यानंतर तो फरार झाला.
- गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सची राजधानी असलेले पॅरिस अलर्टवर आहे.

गेल्या महिन्यात झाला होता 26/11 सारखा हल्ला
- पॅरिसमध्ये 13-14 नोव्हेेंबर दरम्यान एक स्टेडियम, 2 कॅफे आणि एका म्युझिक कॉन्सर्ट हॉलसह 6 ठिकाणी हल्ले झाले होते.
- हल्ल्यांचा मास्टरमाइंड अब्देल हामीद अबाऔद होता. तो बेल्जियममार्गे फ्रान्समध्ये घुसला होता.
- पॅरिस हल्ल्यांच्या नंतर फ्रान्सने संशयित आणि दहशतवाद्यांना पकडण्याासठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत शेकडो छापे टाकण्यात आले होते.
- पॅरिस पोलिसांनी पाच दिवसांतच मास्टरमाइंडलाही अटक केली होती. एखाद्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही सर्वात वेगाने झालेली कारवाई होती.
बातम्या आणखी आहेत...