आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना स्टेयरिंगवाली सर्वात अनोखी कार, आतून आहे एवढी लक्झरीयस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीची फेमस कार कंपनी ऑडीने नुकतीच त्यांची नवी इलेक्ट्रीक कॉन्सेप्ट कार लाँच केली आहे. सुमारे 17 फूट लांब असलेल्या या कामध्ये स्टेअरिंग, गियर, एक्सेलेटर, ब्रेक नाही. ऑडिच्या या खास कारचे वैशिष्ट म्हणजे या गाडीला हेडलाईट्सही नाहीत. 

ग्राफिक्स आणि अॅनिमेशन करणार हेडलाईटचे काम.. 
- 'आयकॉन' (AICON) च्या आत लेटेस्ट हायटेक गॅझेट्स इन्स्टॉल केले आहेत. 
- ही इलेक्ट्रीक कार सेंसर्स आणि रडारच्या मदतीने ड्राइव्ह करता येईल. 
- कारमध्ये हेडलाइट्सच्या जागी ग्राफिक्स आणि अॅनिमेशन आहे, ते हेडलाईट्सचे काम करेल. 
- त्याशिवाय अंधार असलेल्या रस्त्यांवर कारला अटॅच असलेले मिनी ड्रोन वरून लाईट दाखवेल. त्यामुळे लांबपर्यंत पाहणे शक्य होईल. 
- कारची सर्वात खास बाब म्हणजे, याचे फिचर गेस्चर. आवाज आणि डोळ्याच्या इशाऱ्यावर ही कार कंट्रोल करता येईल. 
- या कारमध्ये सीट बेल्टची गरज नाही. आपत्कालीन स्थितीत ऑटोमॅटिक फिचर्स मालकाचे संरक्षण करतील. 

आरामदायक इंटेरियर
- कारचे इंटेरियर एवढे आरामदायक आहे की, लांबच्या प्रवासातही थकवा येत नाही. 
- गाडीतील सीट तुम्हाला हवे तसे ऑपरेट करता येतात. म्हणजे आरामाने झोप घेता येऊ शकेल. 
- पेट्रोलशिवाय कारमध्ये बॅटरीचीही व्यवस्था आहे. अर्ध्या तासात ती फुल रिचार्ज होते. 
- बॅटरी चार्ज झाल्यानंतर जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास करता येऊ शकेल. 
- काही वर्षांत ही कार ग्राहकांसाठी मार्केटमध्ये येईल. 
- कारमध्ये ऑडीच्या ए-7 ड्रायव्हरलेस कारचे अनेक प्रोटोटाइप असतील. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कारचे काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...