आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हिटलरने मारले होते 60 लाख यहुदी, पाहा कसे केले अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीच्या 94 वर्षीय ऑस्कर ग्रोएनिंग यांना कोर्टाने तीन लाख हत्यांचा आरोपी ठरवत चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ग्रोएनिंगवर दुसऱ्या महायुद्धात हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी कँपमध्ये निर्घृण हिंसाचारात सहकार्य केल्याचा आरोप होता. त्या काळात नाझींची नेमकी स्थिती कशी होती. त्यांच्यावर कशाप्रकारे छळ करण्यात आला, यावर एकदा नजर टाकुयात.

1933 मध्ये जर्मनीची सत्ता मिळवल्यानंतर हिटलरने एका वंशवादी साम्राज्याची स्थापना केली होती. त्याच्या साम्राज्यात यहुदींना सब-ह्यूमन ठरवण्यात आले होते. ते मानवी वंशाचे नसल्याचे याठिकाणी मानण्यात आले. यहुदींसाठी हिटलरच्या या द्वेषाचा परिणाम म्हणजे पुढच्या काळात झालेला नरसंहार. यहुदींना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्याने योजनाबद्धरित्या प्रयत्न केले.

होलोकास्ट इतिहासातील असा नरसंहार होता ज्यात सहा वर्षांमध्ये सुमारे 60 लाख यहुदींची हत्या करण्यात आली होती. त्यात 15 लाख चिमुरड्या मुलांचा समावेश होता. यादरम्यान अनेक यहुदी देश सोडून पळाले तर काहींनी कॉन्सन्ट्रेशन कँपमधील क्रौर्यामुळे तडफडत प्राण सोडले. यादरम्यान, ऑशविच नाझी कँप यहुदींच्या संहाराचा प्रतिक बनला होता.

पोलंडमधील या शिबिरात धर्म, वंश, विचारधारा किंवा शारिरीक अशक्तपणाच्या नावाखाली यहुदींना नाझींच्या गॅस चेंबरमध्ये पाठवले जायचे. येथे यहुदी. राजकीय विरोधक, आजारी नागरिक आणि समलैंगिकांकडून बळजबरी काम करून घेतले जायचे. हा कँप अशा ठिकाणी आणि अशा प्रकारे तयार करण्यात आला होता की, त्यातून कोणाला पळ काढता येत नसे.

पुढील स्लाइड्सवर पाहा. ऑशविच कँपमधील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...