आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन कंपनीच्या मटनाच्या जाहिरातीत गणपती बाप्पा, हिंदू समाजाकडून तिव्र निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न/नवी दिल्ली-ऑस्ट्रेलियामध्ये एका कंपनीने मटनाच्या जाहिरातीत गणपतीला दाखवल्याचा प्रकार समोर घडला आहे. ही जाहिरात प्रदर्शीत झाल्यापासून येथील हिंदू समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर जाहिरात करणाऱ्या या कंपनीवर टिका होत आहे. 'मीट अॅन्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया' असे या कंपनीचे नाव आहे. विशेष म्हणजे या कंपनीने वेबसाईटवर आपण ऑस्ट्रेलियन सरकारचे सहयोगी असल्याचा दावा केला आहे.

काय आहे प्रकरण...?
- 'मीट अॅन्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया'ने सोमवारी एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जारिरातीच्या माध्यामातून मेंढीचे मांस प्रमोट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
- प्रसिध्द होताच ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ऑस्ट्रेलियाची अशा प्रकारच्या जाहिरातींवर लक्ष ठेवणारी एजंसी ऑस्ट्रेलियन स्टॅंडर्डस ब्यूरो या प्रकरणी चौकशी करत आहे.

आणखी कोण आहे जाहिरातीत...
- या जाहिरातीत गणपती बप्पा एका टेबलवर सर्वात पुढे दाखवण्यात आले आहे. त्याच्या सोबत जीजस, बुद्ध आणि ज्यूस हे ही दिसत आहेत. हे सर्व एका डायनिंग टेबलवर दाखवण्यात आले आहे.
- एकाची टॅग लाइनही अत्यंत वादग्रस्त आहे. ‘द मीट-वी कॅन ऑल ईट’ म्हणजे असे मटन जे आपण सर्व खाऊ शकतो असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे.

हिंदू समाजाने केला विरोध...
- वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतीय समाजाचे प्रवक्ते नितिन वशिष्ठ यांनी या जाहिरातीचा कडक शब्दात विरोध केला आहे. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या मार्केटिंग पद्धतिमुळे आमचा समाज दुखावला गेला आहे, आम्ही याचा निषेध करतो.
- सोशल मीडियावरही 'मीट अॅन्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया'च्या या जाहिरातीवर लोक टिका करत  आहेत.
 
कंपनी काय म्हणाली...
- जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर  'मीट अॅन्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया'चे मार्केटिंग मॅनेजर अॅंड्यू होवी म्हणाले की, नवीन कँपेन चालूच राहिल. या जाहिरतीत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, तुम्ही कोमत्याही धर्माला मानणारे असाल, तर या मटनासाठी सर्व एकत्र होऊ शकतात.
- होवी पुढे म्हणाले, मेंढीचे मांस अनेक दशकांपासून लोकांना एकत्र जोडत आहे. हा मॉडर्न बारबेक्यू आहे. आमच्या मार्केटिंगचे लक्ष जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचने आहे. यावेळी आम्ही वेगवेगळ्या धर्मांना मानणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे
 
बातम्या आणखी आहेत...