आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 19व्या शतकातील तुरुंगाचे झाले हायटेक होस्टेल, मिळाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रीमेंटल - ऑस्ट्रेलियाच्या फ्रीमेंटल शहरातील हा तुरुंग आता पर्यटकांसाठी वेगळा अनुभव राहाणार आहे. हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल, पण ते खरे आहे. 19 व्या शतकातील फ्रीमेंटल तुरुंगात आता कैदी नाही तर, पर्यटक राहाणार आहेत. जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या या इमारतीचे आता तुरुंगातून होस्टेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. जगभरातील पर्यटक आता येथे राहाणार आहेत. ज्या बराकीत गंभीर गुन्ह्यातील कैदी राहात होते आता त्या रुममध्ये राहाण्याचा अनुभव पर्यटक घेणार आहेत.
गेल्या महिन्यापासून या होस्टेलमध्ये मुक्कामासाठी बुकिंग सुरु झाले आहे. या तुरुंगात महिला कैद्यांना ठेवण्यात येत होते. नऊ महिन्याच्या दुरुस्तीनंतर त्याचे होस्टलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या होस्टेलच्या प्रवक्त्या अॅमिली अॅबोट यांनी सांगितले, की आता देशात मुक्कामासाठी आणखी एक अनोखा टुरिस्ट स्पॉट निर्माण झाला आहे. बिल्डिंगच्या भिंती, फ्लोअर, खिडक्या आणि लोखंडी गज हे नक्कीच तुरुंगाचा अनुभव देतील, मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांना होस्टेलमधील सर्व सुविधा मिळणार आहेत.
या इमारतीचे निर्माण 1851 ते 1859 मध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कैद्यांनीच त्याचे बांधकाम केले आणि नंतर त्यांनाच येथे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला येथे कुकहाऊस, बेकहाऊस आणि लॉन्ड्री या सेवा दिल्या जात होत्या. मात्र पर्थ येथील तुरुंग बंद झाल्यानंतर महिला कैद्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा फ्रीमेंटलचा पर्याय समोर आला होता.
1991 मध्ये हा तुरुंग बंद करण्यात आला होता. त्याआधी 136 वर्षे त्याचा वापर केला गेला. 1991 मध्ये येथील तुरुंग बंद करण्यात आल्यानंतर 1993 ते 2009 दरम्यान महिला कैद्यांसाठीच्या भागाचा वापर एका संस्थेला शाळा चालवण्यासाठी करु देण्यात आला होता. 2014 मध्ये यूनेस्कोने या तुरुंग इमारतीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तुरुंगाचे होस्टेलमध्ये झालेले रुपांतर
बातम्या आणखी आहेत...