आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांसह 226 खासदारांना सिद्ध करावे लागणार नागरिकत्व, ऑस्ट्रेलियात संवैधानिक संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माल्कम टर्नबुल - Divya Marathi
माल्कम टर्नबुल
कॅनबेरा - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यासह सर्वच 226 खासदारांना आपल्या नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे. ते ऑस्ट्रेलियाचेच नागरिक आहेत, हे पुराव्यांसह सिद्ध करावे लागणार आहे. पंतप्रधान आणि एवढ्या मोठ्या संख्येने राजकीय नेत्यांवर नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ येण्याचा हा जगातील पहिलाच प्रकार आहे. ऑस्ट्रेलियात दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा शिगेला पोहोचल्याचे हे पडसाद आहेत.
 
उप-पंतप्रधान बरखास्त, ऑस्ट्रेलियात सत्तासंकट
डेप्युटी पीएम बारनाबी जोएस यांना दुहेरी नागरिकत्व असल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांचे नागरिक असल्याने त्यांना आपले पद आणि संसदीय सदस्यत्व गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाच्या हायकोर्टाने दुहेरी नागरिकत्व विरोधात कठोर भूमिका घेतली. कोर्टाने दुहेरी नागरिकत्व प्रकरणी 7 नेत्यांची खासदारकी रद्द केली. वाद वाढल्यानंतर सरकारला देखील संसदीय मंडळ स्थापित करून नवा नियम तयार करावा लागला आहे. विशेष म्हणजे, कनिष्ठ सभागृहात सरकारला केवळ 1 अधिक मत होते. अशात उप-पंतप्रधानांची बरखास्तगी सरकारवर संकट घेऊन आली आहे. 

21 दिवसांत सिद्ध करावे लागेल नागरिकत्व
- पीएम टर्नबुल यांनी सांगितल्याप्रमाणे, कनिष्ठ सभागृहातील 150 आणि वरिष्ठ सभागृहातील 76 खासदारांना 21 दिवसांच्या आत आपले सिंगल सिटिझनशिपचे पुरावे द्यावे लागणार आहेत. पीएम स्वतः या नियमाचा अवलंब करणार आहेत. 
- ऑस्ट्रेलियन माध्यम या मुद्याशी सहमत नाहीत. 1901 मध्ये दुहेरी नागरिकत्वाचा नियम तयार करण्यात आला होता. 117 वर्षांत जग बदलल्यानंतरही या नियमांत बदल कसे झाले नाही असा सवाल ते करत आहेत. 
- देशातील 50% लोकसंख्या दुसऱ्या देशातून येऊन वसली आहे. त्यामुळे दुहेरी नागरिकत्वावर गांभीर्याने सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांवर भरवल्या जात आहेत. 
बातम्या आणखी आहेत...