आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियामध्ये १८५ कोटींचा रोमान्स घोटाळा, ४४% महिला घोटाळ्याच्या शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - घोटाळ्यांच्या घटना आता सार्वत्रिक बनल्या आहेत. परंतु ऑस्ट्रेलियात अनोखा "रोमान्स घोटाळा’ समोर आला अाहे तोदेखील १८५ कोटींचा. गुरुवारी ऑस्ट्रेलियन स्पर्धा व ग्राहक आयोगाने (एसीसीसी) २०१५ मध्ये झालेल्या या घोटाळ्याची आकडेवारी जारी केली आहे. रविवारी व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. त्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन प्रशासनाने लोकांना अलर्ट जारी केला आहे. सावध राहा, तुम्हीही या घोटाळ्याच्या शिकार व्हाल, असा तो इशारा आहे.
एसीसीसीच्या माहितीनुसार २०१५ मध्ये अडीच हजारपेक्षा जास्त लोक डेटिंगदरम्यान फसवले गेले आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या तयारीत व्यग्र असलेल्या तरुणांना अलर्ट जारी करताना एसीसीसीने शुक्रवारी महटले की, कुण्याही व्यक्तीने अशा लोकांपासून सतर्क राहावे, जे पहिल्यांदा प्रेम करत आहेत व तरीही पैशाची मागणी करत आहेत. जर काही गडबड जाणवली तर थांबा व स्वत:ला प्रश्न विचारा, आपला पार्टनर योग्य आहे का? एसीसीसीच्या उपाध्यक्षा डेलिया रिचर्ड यांनी म्हटले, "ही संख्या तर केवळ १०% आहे. हे त्यांच्याच सांगण्यावरून समजलेे जे लपवू शकत नाहीत. अनेक लोकांनी तर कर्ज घेऊन साथीदारासाठी घरदेखील घेतले व ते गमावून बसले. यापैकी अनेक जण असेही आहेेत, ज्यांनी आपले मित्र व कुटुंबीयांकडून कर्ज घेतले.' रोमान्स घोटाळ्यात पीडितांमध्ये ४३.५% महिला व ३९% पुरुष आहेत. याशिवाय १७ टक्के जणांचे लिंग माहिती नाही. यात बहुतांश व्यक्ती ४५ - ५५ वयोगटातील आहेत. डेलिया सांगतात,"रोमान्स घोटाळेबाज सराईत असतात. ते लोकांची कमजोरी जाणतात. काही महिने डेटिंग करतात, जवळीक वाढवतात.' या घोटाळ्याची सुरुवात फेसबुक, सोशल नेटवर्किंगद्वारे होते. त्यामुळे एसीसीसी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डेलिया स्वत: रोमान्स घोटाळ्याच्या शिकार आहेत. त्या प्रेमात पुरत्या गुरफटल्या होत्या. वेळीच प्रकार लक्षात आल्याने त्यांची फसवणूक टळली.