आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया व्हिसा धोरण बदलणार, भारतीयांना फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी विदेशी कामगारांचा व्हिसा ४५७ रद्द करून टाकला असून त्यासाठी कडक अटीही लादल्या आहेत. या नियमाचा सर्वाधिक फटका भारताला आणि त्यानंतर ब्रिटन,चीनला बसणार आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात टर्नबुल भारत दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दिल्ली मेट्रो, अक्षरधाम भेट तसेच सेल्फी घेऊन दोन्ही देशांतील संबंध अत्यंत दृढ असल्याचे संकेत दिले होते.

टर्नबुल याविषयी म्हणाले की, व्हिसा ४५७ उपक्रमांतर्गत परदेशातून आॅस्ट्रेलियात स्वस्तात कामगार येत होते आणि त्याचा फटका स्थानिक युवकांच्या रोजगारांच्या संधीवर होत आहे.  आम्ही हे धोरण रद्द करत आहोत. नवीन धोरणानुसार आता फक्त कुशल कामगारच ऑस्ट्रेलियात येऊ शकतील.   व्हिसा ४५७ धोरणानुसार ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ऑस्ट्रेलियात ९५, ७५७ कामगार आले होते. या धोरणानुसार कंपन्या कुशल रोजगारासाठी विदेशी कामगारांना चार वर्षांसाठी कामावर ठेवू शकतात.

कट्टर देशभक्त असल्याचा देखावा  
टीकाकारांच्या मते, माल्कम टर्नबुल हे कट्टर देशभक्त असल्याचा दावा करतात. याच दाव्याच्या अनुषंगाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प देणार एच-१ बी व्हिसावर आदेश
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम “हायर अमेरिकन बाय अमेरिकन’ धोरणानुसार एच-१बी व्हिसावर नियंत्रण लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. यासाठी ते कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष पॉल रयान यांच्या मिलवॉकी या मतदारसंघात जाणार आहेत. या व्हिसासाठी सर्वाधिक अर्ज करणाऱ्यांत भारतीय आयटी क्षेत्रातील उमेदवारांंचा समावेश आहे. पुढील वर्षासाठी या व्हिसाची मर्यादा ६५ हजारच आहे. मात्र १ लाख ९९ हजार अर्ज आले आहेत.

आगामी बदल
{ सध्या व्हिसा ४५७ अनुसार ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या ९५ हजार परदेशी कामगार-कर्मचाऱ्यांवर  याचा परिणाम होईल.   
{ व्हिसा ४५७ च्या जागी नवीन अस्थायी व्हिसा व्यवस्था आणली जाईल. ‘टेम्पररी स्किल शॉर्टेज व्हिसा’ नावाने नवे धोरण लागू करण्यात येईल.  
{ व्हिसा मिळवण्यासाठी रोजगार यादीतील २०० पेक्षा अधिक पात्रता निकष कमी केले जातील.   
{ नवीन व्हिसा चारऐवजी दोनच वर्षांसाठी असेल. वेतनाच्या अटी  अनुभवाच्या आधारे निर्धारित करण्यात येतील.  
{ चार वर्षीय व्हिसा घेण्यासाठी इंग्रजी भाषेत उच्च प्रावीण्य अनिवार्य असेल.

कृष्णवर्णीयांची संख्या घटली
ऑस्ट्रेलियामध्ये १९०१ ते १९७३ दरम्यान कृष्णवर्णीयांचे देशात येण्याचे प्रमाण घटले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाने वेगळे धोरण हाती घेतले होते. त्यानुसार इंग्रजी भाषेची अत्यंत कठीण परीक्षा ठेवली जाते.

आम्ही ४५७ व्हिसामुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या हक्काच्या रोजगारावर गदा आणू शकत नाही. कुशल रोजगारात ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना प्राधान्य देण्याच्या धोरणाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहोत.
- माल्कम टर्नबुल, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया
बातम्या आणखी आहेत...