आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांना मदत, नागरिकत्व रद्द होणार;ऑस्ट्रेलियाचे कडक कायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियाने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अधिक कडक कायदे केले आहेत. नव्या कायद्यांतर्गत कोणताही नागरिक दहशतवाद्यांना मदत करत असेल तर त्याचे नागरिकत्व आपोआप संपुष्टात येईल. अशा नागरिकांच्या अपत्यांचेही नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद यात आहे. मात्र, त्यात काही अपवाद दिले आहेत. बुधवारी कायदे बदलाचे हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले. परदेशी दहशतवादी संघटनांना मदत करणारे, देशांतर्गत अशा कारवायांना प्रोत्साहन देणार्‍या नागरिकांचे नागरिकत्व आता आपोआप रद्द होईल. २० संघटनांना ऑस्ट्रेलियन सरकारने दहशतवादी गटांच्या यादीत टाकले आहे.

या कायद्याची चौकट संपूर्णपणे कायदेशीर असल्याचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबोट म्हणाले. मध्यपूर्वेत अशा नागरिकांचे वाढते प्रमाण पाहता सरकारने मुद्दाम हा हाय अलर्ट जारी केला आहे.

अल्पवयीन असले तरी नागरिकत्व रद्द
नव्या कायद्यानुसार दहशतवादाशी संलग्न राहणार्‍या नागरिकांच्या अपत्यांचेही नागरिकत्व संपुष्टात येणार आहे. यात काही सूट देण्यात आली आहे. या मुलाच्या संगोपनासाठी जर ऑस्ट्रेलियन पालक मिळाले वा कोणी पालकत्व स्वीकारले तर त्यांचे नागरिकत्व अबाधित राहील.
बातम्या आणखी आहेत...