आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसमध्ये बँकेबाहेर रडणाऱ्या वृद्धाचे छायाचित्र पाहून ऑस्ट्रेलियातील व्यक्तीने दिला मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेम्स (इन्सेट) लवकरच वडिलांचे मित्र यॉर्गाेसना भेटण्यास ग्रीसला जातील. - Divya Marathi
जेम्स (इन्सेट) लवकरच वडिलांचे मित्र यॉर्गाेसना भेटण्यास ग्रीसला जातील.
सिडनी - गेल्या आठवड्यात ग्रीसच्या थेसालोनिकी शहरातील एक छायाचित्र जगासमोर आले. पाहता-पाहता ते ग्रीसच्या आर्थिक संकटाचा चेहरा बनले. छायाचित्रात सत्तर वर्षांचे एक वृद्ध ढसाढसा रडत होते. चार वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या पत्नीची सुमारे आठ हजार रुपयांची (१२० युरो) पेन्शन जारी करण्यास मनाई केली होती.

यार्गोस चात्सीफोटियाडिस यांचा हा फोटो जगभरात कोट्यवधी लोकांच्या नजरेखालून गेला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गॅप वित्तीय कंपनीचे सीईओ जेम्स कोफोज यांची नजर त्यावर खिळली अन‌् यार्गोेस यांच्या मदतीचा मार्गही उघडला. स्वत: जेम्स हेही थेसालोनिकीचेच. फोटोतील व्यक्ती ओळखीची असल्याचे त्यांना वाटले. यानंतर त्यांनी ग्रीसमध्ये राहणा-या आपल्या आईशी फेसबुकवर बोलताना फोटोचा उल्लेख केला. आईनेही हा फोटो बाबांच्या मित्राचाच असल्याचे स्पष्ट केले. जेम्स यांना आठवले की, आपल्या बहिणीच्या लग्नात याॅर्गोसही आले होते. मग त्यांनी आर्थिक मदत करता यावी म्हणून याॅर्गोस यांना लवकर शोधून काढण्यास आईला सांगितले. फेसबुकवरही यॉर्गोसना शोधण्याचे आवाहन केले. पोस्टमध्ये म्हणाले, मी एका मेहनती ग्रीस नागरिकाला असे तडफडताना पाहू शकत नाही. मी व माझी कंपनी त्यांना वर्षभर व त्यापेक्षा जास्त पेन्शन देईल. त्यांना जर दर आठवड्यात ११ हजार (१७० युरो) पेन्शन मिळत असेल तर आम्ही १७,५०० रु. (२५० युरो) देऊ.
या घटनेनंतर जेम्स यांनी एका फंडिंग ट्रस्टचीही सुरुवात केली आहे. ते म्हणाले, यॉर्गोेस यांच्या फोटोने माझे अंतर्मन ढवळून निघाले. त्यांच्यासारख्या इतर लोकांचीही मदत करण्याचा माझा मनोदय आहे. यासाठी अनेक कंपन्यांकडे मदत मागितली आहे.