आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Jihadi Married His Daughter To Monster Who Raped Yazidi Girls

ISIS दहशतवादी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून सिरियात, रेपीस्टसोबत लावून दिले मुलीचे लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IS ला जॉइन झाल्यानंतर खालिद त्याच्या मुलांसह. - Divya Marathi
IS ला जॉइन झाल्यानंतर खालिद त्याच्या मुलांसह.
बैरुत - कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील विविध देशांमधील लोक आपले सुरळीत चाललेले आयुष्य सोडण्यास तयार आहेत. याचे ताजे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचा खालिद शरीफ सहकुटुंब सिरियात आला आणि आयएसआयएसचा सदस्य झाला. एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने त्याच्या 13 वर्षांच्या मुलीचा विवाह एका अशा दहशतवाद्याशी लावून दिला ज्याने यजीदी महिलांवार अमानुष बलात्कार केला होता. खालिदने आयएसआयएस जॉइन केल्यानंतर गुप्तहेरीचा संशय असलेल्या अनेकांचा शिरच्छेद केला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या सात वर्षांचा मुलाचा फोटो सोशल साइटवर शेअर केला होता. त्यात त्याच्या हातात धडावेगळे केलेल शिर होते. आता अशी माहिती आहे, की खालिद त्याच्या कुटुंबीयांना ऑस्ट्रेलियाला पाठवू इच्छितो.
कसा आला सीरियामध्ये
खालिद पत्नी टारा आणि पाच मुलांसह या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाहून सीरियात पोहोचला. त्यासाठी त्याने त्याच्या भावाच्या पासपोर्टचा वापर केला होता. 2013 मध्ये त्याचा जीवलग मित्र मोहम्मद इलोमरसह तो मीडल इस्टमध्ये पोहोचला होता. त्यानंतर त्याने त्याच्या 13 वर्षांच्या मुलीचे लग्न इलोमरसोबत लावून दिले. आयएसआयएसमध्ये खालिद सुरक्षा व्यवस्थेचा संयोजक म्हणून काम करतो. स्वतःच्या मुलांच्या हातात कापलेले शिर देऊन त्याचे फोटो सोशल साइट्सवर शेअर केल्याने तो संपूर्ण जगात कुख्यात आहे. इलोमरसह खालिदने अनेक यजीदी महिला आणि मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मृत्यू झाल्याची अफवा पसरवली ?
खालिद आणि त्याच्या मित्राचा गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, यात त्याच्या मित्राचा मृत्यू झाला असून खालिद स्वतःच्या मृत्यूची अफवा पसरवून अंडरग्राऊंड झाला असल्याची माहिती आहे. मित्र इलोमरच्या मृत्यूनंतर आता खालिदने कुटुंबाला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठीच त्याने मृत्यूची अफवा पसरवल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला कुटुंबीयांसह मायदेशी परत येऊ द्यावे किंवा नाही यावरुन ऑस्ट्रेलियामध्येही चर्चा सुरु झाली आहे.