आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडांचा सांगाडा झाली होती ही तरुणी, 3 वर्षांत बनवली अशी फिगर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबेरा - ऑस्ट्रेलियात राहणारी पॅरामेडिक लॉरा बिशपने अॅनारेक्सिया आजाराशी आपल्या संघर्षाची कहाणी शेअर केली आहे. 17 वर्षांची असताना ती 'ईटिंग डिसॉर्डर' अवस्थेची शिकार झाली होती. या अवस्थेत एखाद्या व्यक्तीला आपण जाड होऊ या भितीने कमी खाण्याची सवय लागते. तर काहींना आपण किती खात आहोत याचा पत्ताच लागत नाही. लॉराच्या मनात त्यावेळी आपण जाड होऊ अशा भितीने घर केले होते. याच भितीने ती जेवण करण्याऐवजी दिवसभर च्विंगम चघळायला लागली. तिने जेवण तर दूरच ओठांवर लिप क्रीम लावणे सुद्धा सोडून दिले होते. अशात तिचे वजन इतके कमी झाले, की ती हाडांचा सांगाडा बनली होती. 
 

लहान मुलांचे कपडे घालण्याची नामुष्की
- एल्बरी एनएसडब्ल्यू येथे राहणाऱ्या लॉराने सडपातळ होण्याचा हट्ट धरला होता. ती ईटिंग डिसॉर्डरच्या आहारी गेली होती. लिप बाममध्ये फॅट असल्या कारणाने तिने ते लावणे सुद्धा बंद केले होते. 
- तेल किंवा तेलाचे पदार्थ पाहताच तिला आपण फॅट होऊ अशी भिती वाटत होती. तिने मटन, ब्रेड, डेरी प्रॉडक्ट आणि फळे सुद्धा खाणे बंद केले होते. 
- लॉराने सांगितल्याप्रमाणे, ती इतकी बारीक झाली होती, की तिला कपडे खरेदी करताना लहान मुलांचे कपडे घालण्याची वेळ आली होती.
- वेळ अशी आली होती की तिला अंगदुखी, केस गळती, डोकेदुखी आणि वारंवार चक्कर येण्याचे त्रास सुरू झाले होते. 
- तिच्या शरीरातील अवयवांच्या हालचाली, हृदयाचे ठोके सुद्धा कमी झाले होते. या सर्व गोष्टींमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 
 

असे बदलले आयुष्य
लॉराने सांगितल्याप्रमाणे, लहानपणापासूनच तिने पॅरामेडिक होण्याचे स्वप्न पाहिले होते. याच स्वप्नाने तिचे आयुष्य बदलले आहे. पॅरामेडिकचे शिक्षण घेत असताना आरोग्य आणि योग्य शरीरयष्टी असणे आवश्यक आहे. हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या कोर्सनेच तिला फिट होण्यासाठी प्रेरित केले. एका वर्षात ती बरी सुद्धा होऊ लागली. आणि अवघ्या 3 वर्षांत तिने अशी फिगर मिळवली. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉराचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...