आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब डिंकामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दोन महिने लांबणीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएन्ना - युरोपातील प्रमुख देश असलेल्या ऑस्ट्रियात खराब डिंकामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी लागली आहे. गृहमंत्री वुल्फगँग सोबोत्का यांनी सोमवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. निवडणूक तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर किंवा ४ डिसेंबरला निवडणूक होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष ४ डिसेंबरसाठी तयार झाले आहेत.
ऑस्ट्रियात ८ जुलै ही निवडणुकीची तारीख निश्चित झाली होती. तत्पूर्वी राष्ट्राध्यक्ष हँज िफशर यांनी राजीनामाही दिला होता. तेव्हापासून पीठासीन अधिकारीच आता काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये ऑस्ट्रियाचा समावेश होताे. ऑस्ट्रियात शुक्रवारपासूनच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर साशंकतेचे ढग निर्माण झाले होते. त्यामागे कारण ठरले पोस्टल मतदानातील त्रुटी. पोस्टाने पाठवण्यात येणाऱ्या लिफाफे त्याला लावलेल्या डिंकाने व्यवस्थितपणे चिकटत नाहीत. त्यामुळे हे लिफाफे कोणीही सहजपणे उघडून पाहू शकतो. त्यातून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होतो, असा आक्षेप असंख्य मतदारांनी केला. मेमध्ये झालेल्या निवडणुकीत सात लाख लोकांनी पोस्टाने मतपत्रिका पाठवल्या होत्या. ऑस्ट्रियात संसदीय लोकशाही प्रणाली आहे.
बातम्या आणखी आहेत...