आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मॉडेलच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, पोस्टमॉर्टममध्ये समोर आले हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी रशियाहून चीनला गेलेल्या 14 वर्षीय मॉडेलच्या मृत्यूने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. चिनी मॉडेलिंग एजंसीने तिच्याकडून इतके काम करून घेतले, की तिला झोपण्याचीही वेळ दिली नाही. रात्रंदिवस काम करून आणि उपाशी राहून तिचा मृत्यू झाला असे सांगितले जात होते. आता तिच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालात डॉक्टरांनी विषचा उल्लेख केला आहे. तिच्या शरीरात विषचे सत्व सापडले आहेत. त्यामुळे, डॉक्टरांनी तिचा मृत्यू जास्त कामामुळे झाला नाही तर प्रत्यक्षात तिचा खून करण्यात आला असे संकेत दिले आहेत. 

 


रशियन मॉडेल व्लादा झ्यूबा (14) हिच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात एजंसीजकडून किती राबवून घेतले जाते. किती शोषण केले जाते अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, शवविच्छेदनातून या मृत्यूच्या तपासाची दिशाच बदलण्यात आली आहे. व्लादा नुकतीच चीनच्या एका मॉडेलिंग एजंसीसोबत करार करून रशिया सोडून चीनला गेली होती. तिने मरण्यापूर्वी आपल्या आईशी संवाद साधला होता. त्यामध्ये तिने आपल्याला खूप अशक्तपणा जाणवत असून झोपण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर तिच्या मृत्यूचेच वृत्त समोर आले. तिच्या शरीरात बायोलॉजिकल पॉयझन (जैविक विष) सापडले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, इतकी सुंदर होती व्लादा...

बातम्या आणखी आहेत...