आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये हिमस्खलनात 115 ठार, 50 जखमी, गाव उद्धवस्त, अनेक बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल/इस्लामाबाद- अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिमवृष्टी आणि हिमस्खलनामुळे 115 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानात शेरशाल हे गाव पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. गावातील 100 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. 
दुसरीकडे, पाकिस्तानात मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. त्याच 6 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे.

घरे जमिनदोस्त, वाहतूक ठप्प...
- अफगाणिस्तानचे आपातकालिन व्यवस्थापनाचे प्रवक्ते ओमर मोहम्मदी यांनी सांगितले की, देशातील 34 पैकी 22 राज्यांना हिमवृष्टीसोबत हिमस्खलनाचा फटका बसला आहे. 
- मागील 4 दिवसांत हिमवृष्टी आणि हिमस्खलनामुळे अनेक घरे जमिनदोस्त झाले आहेत. अनेक राज्यात वाहतूक ठप्प झाली आहे.
- नूरिस्तान राज्यातील बरगामताल जिल्ह्यात एक गाव पूर्णपणे उद्धवस्त झाले असून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. 
- परवानचे राज्यपाल मोहम्मद असीम यांनी सांगितले की, राज्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.  
- देशात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा... जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि वादळामुळे दोघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

PAK मधील शेरशाल गावात 10 घरे बर्फाखाली दबले...
-जियो न्यूजनुसार, चित्राल भागात रविवारी झालेल्या हिमस्खलनात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे.
- सर्वत्र बर्फ पसरला असून बर्फाखालून आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक मृतदेह बर्फाखाली दबले असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. 
- सातत्याने होणार्‍या हिमवृष्टीमुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. 
 
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात हिमस्खलनामुळे उडालेले हाहाकार पाहा, पुढील स्लाइडवर क्लिक करून....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...